२४ जुलै २०२०

मान्सूनचे स्वरूप


अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल
ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण
क) मान्सूनचा खंड
ड) मान्सूनचे निर्गमन

▪️अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल


▪️ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण

1) आर्द काल व शुष्क काल
- सर्वसामान्य माणसाच्याया दृष्टीने मान्सून म्हणजे पाऊस असाच निगडित आहे.
- अर्थात मान्सूनचा पाऊस कधीच सातत्याने पडत नाही तर तो अधून मधून पडतो .
- आर्द कालाच्या  पाठोपाठ शुष्क काल येतो 

2) पाऊसाचे  वितरण
- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या उष्ण कठीबंधीय आवरतामूळे भारतीय मैदानी प्रदेशात पाऊस पडतो .
- नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या अरबी समुद्राच्या शाखेमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला पाऊस मिळतो .
-  पश्चिम घाटांमुळें पडणारा हा पाऊस प्रतिरोध पर्जन्याचा असतो .
- पश्चिम किनारपट्टीजवळींल विषुववृत्तीय जेट स्ट्रीमच्या स्थानावर पश्चिम किनारपट्टीवरील पाऊस अवलंबून असतो .

3) मान्सून द्रोणी  व आवर्ताचा संबंध
- बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या उष्ण कटिबंधीय अवरताची वारंवारिता दरवर्षी बदलत असते .
- आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभावन  पट्याच्या स्थानावर आवर्ताचा मार्ग अवलंबून असते ; याला भारतीय मौसम science मध्ये `मान्सून द्रोणी' ( mansoon trough) म्हणतात . ज्याप्रामाने मान्सून द्रोणीचा आस आंदोलीत होत जातो त्याप्रमाने  आवर्ताचा मार्गही बदलतो . त्यामुळे पाऊसाची तीव्रता दरवर्षी पडणार्या वितरणामध्ये फरक असतो.
- पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व व ईशान्यकडे तर भारतीय मैदानावर व द्विकल्पाच्या उत्तर भागात वायव्येकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी-कमी होत जाते.

क) मान्सूनचा खंड
- नैऋत्य मान्सूनच्या काळात पाऊसात साधारणपणे खंड पडतो. हा खंड बऱ्याच वेळा एक वा दोन आठवडे किंवा आणखी काही आठ्वडेही असू शकतो .यालाच मान्सूनमधील खंड असे म्हणतात.

🔹पाऊस न पडण्याची अनेक कारणे पुढीलप्रमाणे ....

- पाऊस घेऊन येणारे उष्ण काठिबंधीय आवार्ते वारंवार निर्माणन न झाल्याने अश्या प्रकारचा खण्ड पडतो .
- उत्तर भारतात मान्सून द्रोणीच्या स्थानामुळे पाऊस पडत नाही.
- भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर वारे वाहत असतील तर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस येत नाही.
- पश्चिम राजस्थानात वातावरणाच्या भिन्न स्तरावर तापिय परिस्तितीमुळे पाऊस पडत नाही .
- तापमानाच्या विपरीततमुळे घेऊन जाणार्या वाऱ्याना उंचीवर जाता येत नाही .

ड) मान्सूनचे निर्गमन
- वायव्य भरतामधून सप्टेंबरमध्ये मान्सूनचे निर्गमन होते . द्विकल्पाच्या दक्षिण भागमधून मध्य ऑक्टोबरला  मान्सूनचे निर्गमन होते .
- मान्सूनचे निर्गमन होत असताना बंगालच्या उपसगरावरून वारे वाहतात .बाष्प गोळा व ईशान्य मान्सून वारे म्हणून तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस देतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...