Friday 24 July 2020

One liner सराव प्रश्न उत्तरे

● ‘वन्यजीव अभयारण्य’चा दर्जा कोणत्या वनाला प्रदान करण्यात आला?

उत्तर : ‘पोबा’ (आसाम)

● “अंजी खाड पूल” हा भारतातील पहिला तारांच्या सहाय्याने उभारलेला रेल्वे पूल कोणती कंपनी बांधणार आहे?

उत्तर : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (के. आर. सी. एल.)

● "द तंगम्स" या शीर्षकाच्या पुस्तकाचे कोणी अनावरण केले?

उत्तर : पेमा खंडू, अरुणाचल मुख्यमंत्री

● कोणत्या समस्येला तोंड देण्यासाठी भारत आणि इस्रायल या देशांनी एक करार केला?

उत्तर : सायबर गुन्हे

● खाद्यान्नावरील प्रक्रियेच्या संदर्भातल्या ‘डिजिटल भारत-इटली व्यवसाय अभियान’चे उद्घाटन कोणत्या व्यक्तीच्या हस्ते झाले?

उत्तर : हरसिमरत कौर बादल, केंद्रीय खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्री

● ‘FIFA विश्व चषक 2022’ ही स्पर्धा कोणत्या देशात खेळवली जाणार आहे.

उत्तर : कतार

● ‘वंदे भारत’ मोहिमेचे नवे रूप म्हणून कोणत्या योजनेला ओळखले जाते?

उत्तर : 'एअर बबल'

● दिल्लीत पाचव्या ‘उड्डयन आणि संरक्षण निर्मिती तंत्रज्ञान’ परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?

उत्तर : श्रीपाद येसो नाईक

● ‘आर्मी कमांडर’ परिषदेचे अध्यक्ष कोण आहे?

उत्तर : भुदलाचे प्रमुख (जनरल एम.एम. नरावणे)

● ‘इकाबॉग’ हे शीर्षक असलेल्या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

उत्तर : जे. के. रोलिंग (प्रसिद्ध ब्रिटिश लेखिका)

● शारीरिक ताण निर्माण झाल्यास ‘धक्के शोषक’ म्हणून काम करून एक्सॉन (मज्जापेशीपासून सुरू होणारा तंतू) यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करणाऱ्या रेणूचे नाव काय?

उत्तर : स्पेक्ट्रिन

● ‘सायबर सेफ्टी- ए हँडबुक फॉर स्टूडेंट्स ऑफ सेकंडरी अँड सीनियर सेकंडरी स्कूल्स’ हे शीर्षक असलेले पुस्तक कोणत्या संस्थेनी प्रकाशित केले?

उत्तर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)

● जगातले पहिले ‘कॉन्टॅक्टलेस विझिटर मॅनेजमेंट सॉफ्टवेअर’ कोणत्या कंपनीने विकसित केले?

उत्तर : व्हीएएमएस ग्लोबल ( ‘VAMS सेफगार्ड’)

● भारतीय हवाई दलाच्या कोणत्या स्क्वाड्रनमध्ये ‘तेजस’ विमानांच्या तुकडीचा समावेश करण्यात आला आहे?

उत्तर : फ्लाइंग बुलेट्स

● ‘कोविड कथा’ या पुस्तकाची हिंदी आवृत्ती कोणत्या संस्थेनी प्रसिद्ध केली?

उत्तर : राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संप्रेषण परिषद (NCSTC)

● ‘न्यू डेव्हलपमेंट बँक’ या संस्थेच्या अध्यक्ष पदावर कोणाची निवड झाली?

उत्तर : मार्कोस प्राडो ट्रोयजो

   
▪️ वैद्यकीय उपयोगासाठी गांजा वनस्पतीची शेती कायदेशीर करणारा पहिला आखाती देश कोणता आहे?
उत्तर : लेबनॉन

▪️ सीमा रस्ते संस्थेनी (BRO) कोणत्या नदीवर कासोवाल क्षेत्राला उर्वरित देशाशी जोडणारा पूल बांधला?
उत्तर : रावी नदी

▪️ कोणत्या शहरात ‘आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण’ याचे मुख्यालय आहे?
उत्तर : गांधीनगर

▪️ कोणता देश ‘ट्रेंड इन मिलिट्री एक्स्पेंडिचर लिस्ट 2019’ यामध्ये अग्रस्थानी आहे?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

▪️ कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी “कोविड-19 टूल्स (ACT) एक्सेलिरेटर” कार्यक्रमाची सुरुवात केली?
उत्तर : जागतिक आरोग्य संघटना

▪️ कोणत्या राज्यात दारापर्यंत औषधी पोहचविण्याकरिता ‘धन्वंतरी’ योजना राबविण्यात येत आहे?
उत्तर : आसाम

▪️ तामिळनाडू राज्यातल्या कोणत्या विमानतळाचा दर्जा ‘लेव्हल 3’ करण्यात आला आहे?
उत्तर : थुथुकुडी विमानतळ

▪️ चर्चेत असलेले ‘रुहदार’ हे काय आहे?
उत्तर : कमी किंमतीचे व्हेंटिलेटर

▪️ 2020 या वर्षी जागतिक पशुचिकित्सा दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : एनव्हिरोंमेन्टल प्रोटेक्शन फॉर इम्प्रूव्हींग अॅनिमल अँड ह्यूमन हेल्थ

▪️ कोणत्या संस्थेनी हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या बस आणि कार प्रकल्प आरंभ केला?
उत्तर : NTPC

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...