Tuesday 11 August 2020

टिकटॉकला 15 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकला 15 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय एखाद्या अमेरिकन कंपनीने 15 सप्टेंबरपर्यंत विकत घेतला नाही, तर त्यानंतर टिकटॉकवर अमेरिकेत बंदी घातली जाईल असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले  आहे.

सॉफ्टवेअर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘मायक्रोसॉफ्ट’ला टिकटॉकच्या खरेदीमध्ये रस आहे.

बाइटडान्सकडे टिकटॉकची मूळ मालकी आहे. टिकटॉक अ‍ॅपचा 30 टक्के नाही तर 100 टक्के व्यवसाय खरेदी करावा अशी डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका आहे.

या विषयासंदर्भात आपण मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्यासोबत चर्चा केल्याचे ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...