२९ ऑगस्ट २०२०

भारतीय कंपनी बनवतेय प्लाझ्मा थेरीपीची लस; लवकरच होणार मानवी चाचणी.



🔰जगभरात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातही करोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ पाहायला मिळत आहे. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर लस तयार करण्याचा अनेक देशांकडून प्रयत्न सुरू आहे. यात भारतही आघाडीवर आहे. दरम्यान, पुढील महिन्याभरात इंटास फार्मा देशातील पहिली प्लाझ्मा थेरेपी लसीच्या माानवी चाचणीला सुरूवात करणार आहे. आजतकनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

🔰सध्या करोना विषाणूचा कोणताही उपाय सापडलेला नाही. अनेक देशांमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीवरही संशोधन सुरू आहे. तक काही देशांनी लस तयार केल्याचाही दावा केला आहे. तर दुसरीकडे करोनाच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपीदेखील उपयोगी असल्याचं समोर आलं होतं. याचदरम्यान देशातील फार्मा कंपनी इंटास फार्मानं प्लाझ्मा थेरेपीप्रमाणेच असलेली लस विकसित करण्यावर काम सुरू केलं आहे. रुग्णाला ही लस दिल्यानंतर त्यांना प्लाझ्मा थेरेपी देण्याची आवश्यकता नसल्याचा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे.

🔴पहिली लस...

🔰“करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात अशाप्रकारची पहिली लस विकसित करण्याचं काम सुरू आहे. ही लस पूर्णत: स्वदेशी आहे. हायपरिम्युन ग्लोब्युलिन (Hyperimmune Globullin) ला ड्रग्झ कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून कोविड १९ वरील उपचाराच्या मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. गुजरात आणि देशातील अन्य रुग्णालयांसोबत याची वैद्यकीय चाचणी केली जाईल,” अशी माहिती इंटास मेडिकल अँड रेग्युलेटरी अफेअर्सचे प्रमुख डॉ. अलोक चतुर्वेदी यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...