परथमच, ‘एकलव्य मॉडेल निवासी शाळा’ शिक्षकाची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.🔰आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापना झालेल्या ‘एकलव्य मॉडेल निवासी शाळा’ (EMRS) याच्या शिक्षकाची प्रथमच ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांचे नाव आहे, कु. सुधा पाईनुली.

🔰क. सुधा पाईनुली या EMRS शाळा, कलसी (देहरादून, उत्तराखंड) येथे उप-प्राचार्य पदावर रुजू आहेत.

🔰यदा म्हणजेच 2020 या वर्षी एकूण 47 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जम्मू व काश्मीरमध्ये रुजू असलेल्या महाराष्ट्राचे सुनिल कुमार यांना हा सन्मान मिळाला आहे.

🔴पार्श्वभूमी....

🔰दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी देशात ‘राष्ट्रीय शिक्षक दिन’ साजरा केला जातो. हा दिवस देशाच्या प्रगतीसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करणार्‍या शिक्षकांच्या सन्मानार्थ पाळला जातो.

🔰भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त देशात राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येते. या पुरस्काराची स्थापना वर्ष 1958 मध्ये झाली. पुरस्कार म्हणून पदक, प्रमाणपत्र, 50 हजार रूपये रोख रक्कम दिली जाते.

🔰दरवर्षी या दिवशी देशाच्या विविध भागात उत्कृष्ट आणि अभिनव कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्याकरिता भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ दिला जातो. हा सत्कार समारंभ विज्ञान भवनात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित केला जातो.

🔴एकलव्य मॉडेल निवासी शाळा योजना
...

🔰दशात ‘एकलव्य मॉडेल निवासी शाळा’ योजना 1997-98 साली लागू करण्यात आली. दुर्गम भागातल्या आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी ही योजना राबवली जात आहे. भारत सरकारचे केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्रालय ही योजना राबवत आहे. सध्या देशात अश्या 462 शाळा आहेत आणि आणखी 288 शाळा उभारण्यास मंजुरी दिलेली आहे.

🔰50 टक्क्यांपेक्षा जास्त अनुसूचीत जमाती (ST) लोकसंख्या आणि किमान 20,000 आदिवासी व्यक्ती रहिवासी असलेल्या देशातल्या प्रत्येक विभागांमध्ये एक ‘एकलव्य मॉडेल निवासी शाळा’ स्थापन करण्यास अलीकडेच सैद्धांतिक मंजुरी देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

ZP पद भरती Strategy

📌📌 Strategy📌📌                मागचे तीन दिवस आयबीपीएस(IBPS) ने पशुसंवर्धन विभागासाठी परीक्षा घेतल्या. या परीक्षांमधील मराठी आणि इंग्लिश...