वाचा :- महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला CANI प्रकल्प कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

*उत्तर* : सबमरीन (समुद्र तळाशी टाकलेली केबल) ऑप्टिकल फायबर

● ‘इंदिरा वन मितान योजना’ कोणत्या राज्याने लागू केली?

*उत्तर* : छत्तीसगड

● ‘सुरक्षा’ नावाचे राष्ट्रीय संकेतस्थळ मानवाचा कोणत्या प्राण्याशी संघर्ष टाळण्याच्या संदर्भात आहे?

*उत्तर* : हत्ती

● IC-IMPACTS वार्षिक संशोधन परिषद भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान आयोजित केली जाते?

*उत्तर* : कॅनडा

● कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन (NIP) याच्या संदर्भातले इंडिया इन्वेस्टमेंट ग्रीड (IIG) व्यवस्था येते?

*उत्तर* : वाणिज्य व उद्योग मंत्रालय

● भारताशी जुळलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी ‘एयर सुविधा’ या नावाने एक संकेतस्थळ कोणत्या विमानतळाने विकसित केले?

*उत्तर* : दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ

● मुंबईत प्राप्तिकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त पदावर कोणाची नेमणूक झाली?

*उत्तर* : पतंजली झा

● RoDTEP योजनेच्या अंतर्गत कमाल मर्यादा निश्चित करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली?

*उत्तर* : जी. के. पिल्लई


● ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2020’ स्पर्धा कोणत्या संस्थेनी जिंकली?

*उत्तर*  : डिफेन्स इन्सिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी

● बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेमध्ये एका रोबोटिक्स प्रयोगशाळेची स्थापना कोणती कंपनी करणार आहे?

*उत्तर*  : नोकिया

● “तेंझाल गोल्फ रिसॉर्ट” कोणत्या राज्यात आहे?

*उत्तर*  : मिझोरम (जिल्हा, एझवाल)

● बास्केटबॉल संघाचा कर्णधार विशाल भृगुवंशीच्या चरित्रावर आधारित ‘विशेष: कोड टू विन’ या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत?

*उत्तर* : निरुपमा यादव

● भारतीय रसायन संशोधन मंडळातर्फे ‘कास्य पदक 2021’ हा सन्मान कोणाला देण्यात आला?

*उत्तर* : श्रीहरी पब्बराजा

● संयुक्त राष्ट्रसंघ प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे जागतिक कार्यक्रम समन्वयक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

*उत्तर*  : प्रवीण परदेशी

● पहिली ‘किसान रेल’ कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान धावली?

*उत्तर*  : देवळाली (महाराष्ट्र) आणि दानापूर (बिहार)

● भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली?

*उत्तर*  : गिरीश चंद्र मुर्मू


● श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली?

*उत्तर* : महिंदा राजपक्षे

● ‘ACJ अन्वेषण पत्रकारिता पुरस्कार’ कोणाला मिळाला?

*उत्तर* : नितीन सेठी (‘द हफिंग्टन पोस्ट इंडिया’ वृत्तसंस्था, पत्रकार)

● अन्न व पोषण क्षेत्रामध्ये सहयोगात्मक संशोधन आणि माहिती प्रसारणासाठी FSSAI सोबत कोणत्या संस्थेचा सामंजस्य करार झाला?

*उत्तर* :  वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)

● ‘स्टारलिंक’ उपग्रहांचा एक संच अंतराळात कोणत्या अंतराळ संस्थेनी पाठवला?

*उत्तर* : स्पेसएक्स

● ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ योजनेसाठी उत्तरप्रदेश सरकारसोबत कोणत्या कंपनीने सामंजस्य करार केला?

*उत्तर* : फ्लिपकार्ट

● “कृषी पायाभूत सुविधा कोष” ही नवी केंद्रीय क्षेत्र योजना किती निधीसह तयार करण्यात आली?

*उत्तर* : 1 लक्ष कोटी रुपये

● यंदा 2020 साली कोणत्या विषयाखाली ‘जागतिक जैवइंधन दिन’ पाळण्यात आला?

*उत्तर* : बायोफ्युल्स टुवर्ड्स आत्मनिर्भर भारत

● KVIC कडून रेशीमसाठी पहिलेच प्रशिक्षण व उत्पादन केंद्र  कोणत्या राज्यात उभारण्यात आले?

*उत्तर* : अरुणाचल प्रदेश


● आयव्हरी कोस्ट देशाच्या पंतप्रधान पदावर कोणाची निवड झाली?

*उत्तर* : हमेद बाकायोको

● स्कोच पुरस्काराने कोणत्या मंत्रालयाला सन्मानित करण्यात आले?

उत्तर* : आदिवासी कल्याण मंत्रालय

● SIDBI संस्थेनी ‘MSME सक्षम’ नामक मंच तयार करण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत भागीदारी केली?

*उत्तर* : ट्रान्सयूनीयन सिबिल

● “विद्यार्थी विज्ञान मंथन, 2020-21” नामक उपक्रमाचा प्रारंभ कोणत्या मंत्रालयाने केला?

*उत्तर* : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

● तीन राजधान्या असणारे कोणते राज्य देशातले पहिलेच राज्य ठरले?

*उत्तर* : आंध्रप्रदेश

● ‘फॉर्म्युला वन ब्रिटीश ग्रँड प्रिक्स 2020’ ही शर्यत कोणी जिंकली?

*उत्तर* : लेविस हॅमिल्टन (87 वा विजय)

● अरब जगतातली पहिली अणुभट्टी कोणत्या देशात आहे?

*उत्तर* : संयुक्त अरब अमिरात

● “2020 बीएल आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महोत्सव’ या स्पर्धेत कोणत्या व्यक्तीने द्वितीय क्रमांक मिळवला?

*उत्तर* : हरिकृष्ण पेंटाला

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...