Friday 14 August 2020

कोकण किनारपट्टी

🅾महाराष्ट्र पच्छिम भागात दक्षिणोत्तर पसरलेली लांब व चिंचोळी किनारपट्टी कोकण आहे. तर पश्चिमेस अरबी पसरलेला आहे.

🅾 सह्यान्द्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या या लांबट चिंचोळ्या सखल भागाला कोकण असे म्हणतात.

🧩कोकणची निर्मिती.

🅾महाराष्ट्रच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली.
तसेच मुंबई जवळील जलमग्न अरण्याचा प्रदेश असे दर्शवतो की किनारपट्टीवर समुद्राची पातळी उंचावली गेली असावी. म्हणजेच किनाऱ्याचे निमज्जन (खचणे) झालेले आहे.

🅾ज्वालामुखी क्रियेचे अवषेस गरम पाण्याच्या रूपाने आढळतात. उदा वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे झरे. कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी सुमारे ७२० कि मी उत्तरेस डहाणूपासून वेगुर्ल्यापर्यंत उत्तरेस दमणगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत त्याचा विस्तार आहे.

🅾सरासरी रुंदी ३० ते ६० कि मी आहे. उत्तरेस काही भागात किनारपट्टी ९० ते ९५ कि मी रुंद आहे. कोकणचे भोगोलिक क्षेत्रफळ सुमारे ३०३९४ चौ.कि.मी आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠कोकणची प्राकृतिक रचना.💠💠

🅾कोकणचा सर्वच भाग हा म्हणजे एक सलग भाग मैदान नाही. हा डोंगरदऱ्यानी व्यापलेला परंतु कमी उंचीचा सखल भाग आहे.

🅾किनाऱ्यापासून पूर्वेकडे सह्यांद्रीच्या पायथ्यापर्यंत ही उंची सुमारे२५० मीटरपर्यंत वाढते.प्रदेशाचा सर्वसाधारण उतार पूर्व पश्चिम दिशेने आहे.

🅾पश्चिमेस अरबी समुद्राच्या सखल भागाला खलाटी असे म्हणतात. समुद्र सपाटीपासून उंची फार कमी आहे.

🅾खलाटीच्या पूर्वेस जो डोंगराळ भाग आहे. त्याला (वलाटी) असे म्हणतात. या प्रदेशाची उंची २७५ ते ३०० मीटरपर्यंत आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠खाडी.💠💠

🅾भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेपर्यंत आत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला खाडी असे म्हणतात.

🅾मुंबईच्या उत्तरेस दातिवरे व वसईची खाडी आहे. तर वसईच्या दक्षिणेस जयगडपर्यत धरमतर, राजकोट, बाणकोट, दाभोळ व जयगडच्या खाड्या आहेत.

🅾 दक्षिणेस विजयदुर्गची खाडी कार्लीची खाडी व कोकणच्या दक्षिण सरहद्दीजवळ तेरेखोलची खाडी आहे.

🅾कोकणची किनारपट्टी रिया प्रकारची आहे. किनार्यावरील खडकात मालवण व हरणे दरम्यान गुहा आढळतात.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠सागरी किल्ले .💠💠

🅾 वसईचा किल्ला, जंजीरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, आणि सिंधुदुर्ग हे समुद्री किल्ले आहेत.

💠💠बंदरे 💠💠

🅾 महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मुंबई हे एक नैसर्गिक बंदर आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे बंदर आहे. मुंबई ताण कमी करण्याच्या दृष्टीने न्हावाशेवा हे अत्याधुनिक बंदर आहेत.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...