भारतीय रेल्वेकडून रेल्वेच्या सुरक्षेसाठी ड्रोन आधारित टेहळणी प्रणालीचा वापर.🔰कमीत कमी मनुष्यबळामध्ये खूप मोठ्या जागेवर सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन टेहळणी प्रणाली एक अतिशय महत्त्वाची आणि किफायतशीर प्रणाली म्हणून उदयाला येत आहे. रेल्वेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे आणि सुरक्षा व्यवस्थेला आणखी पाठबळ पुरवणे हा ड्रोन प्रणाली तैनात करण्याचा उद्देश आहे.

🔴ठळक बाबी..

🔰मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वे स्थानकाची संकुले, रेल्वे ट्रॅक सेक्शन यार्ड, कार्यशाळा इत्यादीसारख्या रेल्वेच्या जागांची अधिक चांगल्या प्रकारे सुरक्षा करण्याकरीता आणि त्यावर लक्ष ठेवण्याकरीता दोन ‘निन्जा’ मानव-रहीत हवाई वाहनांची खरेदी केली आहे. वास्तविक वेळेत शोध, चलचित्रपट तयार करण्याची या ड्रोनची क्षमता आहे आणि स्वयंचलित फॉल सेफ मोडमध्ये देखील त्यांचे परिचालन करता येते.

🔰रल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) चार कर्मचाऱ्यांच्या एका पथकाला ड्रोन उड्डाणाचे, त्याद्वारे लक्ष ठेवण्याचे आणि देखभालीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

🔰रल्वेच्या सुरक्षेसाठी ड्रोनचा व्यापक प्रमाणावर वापर करण्याचे RPF दलाने ठरवले असून आतापर्यंत 31.87 लक्ष रुपये खर्चून दक्षिण पूर्व रेल्वे, मध्य रेल्वे, मॉडर्न कोचिंग फॅक्टरी, रायबरेली आणि दक्षिण पश्चिम रेल्वे येथे नऊ ड्रोन खरेदी करण्यात आले आहेत.

🔰तसेच 97.52 लक्ष रुपये खर्चाने आणखी 17 ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत RPFच्या 19 कर्मचाऱ्यांना ड्रोनचे प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि त्यापैकी चार जणांना ड्रोन उड्डाणाचा परवाना प्राप्त झाला आहे.

🔴ड्रोन प्रणालीचे उपयोग...

🔰रल्वेच्या संकुलात जुगार, कचरा फेकणे, फेरीने विक्री करणे यांसारख्या गुन्हेगारी तत्वांवर लक्ष ठेवण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त आहे.

🔰याचा वापर विविध प्रकारच्या माहितीचे संकलन आणि विश्लेषणासाठी होणार आहे. या माहितीचा उपयोग रेल्वेगाड्यांच्या सुरक्षित परिचालनासाठी आणि संवेदनशील भागांमध्ये होऊ शकतो.

🔰आपत्ती घडलेल्या ठिकाणी मदत, बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी तसेच विविध संस्थांमध्ये समन्वयासाठी देखील ड्रोन तैनात केली जाऊ शकतात.

🔰रल्वेच्या मालमत्तांवर होणारी अतिक्रमणे रोखण्यासाठी या मालमत्तांचा नकाशा तयार करण्यासाठी देखील ड्रोन उपयुक्त आहेत.

🔰खप जास्त प्रमाणात होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करताना जास्त गर्दी होणारी ठिकाणे, गर्दीची वेळ आणि गर्दी पांगवण्यासाठी आवश्यक असलेले उपाय याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती ही प्रणाली उपलब्ध करू शकते आणि त्यानुसार गर्दी नियंत्रणाच्या योजना तयार करून त्यांची अंमलबजावणी करता येणार.

🔰डरोनच्या एका कॅमेऱ्याने आठ ते दहा कर्मचाऱ्यांची गरज असलेल्या खूप मोठ्या भागावर लक्ष ठेवता येऊ शकते. त्यामुळे मनुष्यबळाची टंचाई असताना अतिशय कमी मनुष्यबळामध्ये कामे करता येतात.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...