Thursday 20 August 2020

मोदी सरकारचा मोठा निर्णय! सरकारी नोकरीसाठी सामायिक परीक्षा.



🔰सरकारी नोकरीबाबत मोदी सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय भरती संस्था अर्थात National Recruitment Agency स्थापन करण्यात येईल. त्याद्वारे एकच सामायिक परीक्षा देऊन तरुणांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येईल. शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी युवा पिढी अनेक मार्गाचा अवलंब करते. प्रत्येक संस्था आणि कंपन्या आपल्या परीक्षा ठेवतात. नोकरीच्या महत्त्वाकांक्षेच्या दृष्टीने या सगळ्या परीक्षा देतात. मात्र मोदी सरकारच्या निर्णयामुळे हे चित्र बदलण्याची चिन्हं आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत झालेल्या निर्णयासंबंधी झालेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती दिली.

🔰सरकारी संस्थेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांसाठी सामायिक परीक्षा घेतली जाईल. त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था अर्थात National Recruitment Agency स्थापन करण्यात येणार आहे. या संस्थेत एकदा नोंदणी केली की एकच परीक्षा देऊन युवकांना आपली योग्यता सिद्धता करावी लागेल. नोकरीसाठी दारोदारी परीक्षा देत भटकण्याची वेळ युवा पिढीवर येणार नाही. प्रकाश जावेडकर यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हणले, “युवकांना जागोजागी परीक्षा देण्यासाठी जावं लागू नये म्हणून एकच Common Eligibility test असेल. यात गुणवत्ता सिद्ध करुन उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल.”

🔰आज कॅबिनेट मिटिंगमध्ये राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्याखेरीज आणखी एक मोठा निर्णय झाला. देशातल्या सहा विमानतळांचं व्यवस्थापन आणि दैनंदिन व्यवहार खासगी संस्थेला देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. विमान प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने हे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचं जावडेकर यांनी स्पष्ट केलं.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...