Thursday 20 August 2020

हवामानातल्या बदलांमुळे चातक पक्षीच्या स्थलांतरणाविषयी भारतीय संशोधकांद्वारे अभ्यास.



🌼हवामानातल्या बदलांमुळे चातक पक्षीच्या बदललेल्या स्थलांतरणाचा मागोवा घेण्यासाठी भारतीय संशोधक एक निरीक्षणयुक्त अभ्यास करीत आहेत.

🍁ठळक बाबी...

🌼वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (WII), भारतीय सुदूर संवेदी संस्था (IIRS) आणि जैवतंत्रज्ञान विभाग यांचा हा संयुक्त कार्यक्रम आहे.

🌼आफ्रिकेतून भारतात स्थलांतर करणाऱ्या चातक पक्षीचा मार्गक्रम शोधण्याविषयीचा भारतातला हा पहिलाच अभ्यास आहे.परंपरेनी हिमालयाच्या पायथ्याशी चातक पक्षीचे आगमन ही वर्षाऋतुची चाहूल देते. पावसाळ्याच्या आगमनाच्या वेळेत भारतात दाखल होणारा हा पक्षी ‘वर्षाऋतुचा अग्रदूत’ मानला जातो.

🍁वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (WII) विषयी...

🌼ही भारत सरकारच्या पर्यावरण, वने व हवामानातले बदल मंत्रालयच्या अंतर्गत कार्य करणारी एक स्वायत्त संस्था आहे. त्याची स्थापना 1982 साली झाली. ही संस्था जैवविविधता, धोकादायक प्रजाती, वन्यजीव धोरण, वन्यजीव व्यवस्थापन, वन्यजीव न्यायवैद्य, स्थानिक पद्धती, पर्यावरण विकास, वास्तव्य, हवामानातले बदल इत्यादी सारख्या अभ्यासाच्या क्षेत्रात संशोधन करते.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...