मनोरुग्ण सुरक्षा विधेयक मंजूर.🅾️ मनोरूग्णावस्थेत आत्महत्येचा प्रयत्न करणे यापुढे गुन्हा ठरणार नाही..

🅾️अशा प्रकरणात मानसिक रूग्णावस्थेने ग्रस्त व्यक्तिवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करता येणार नाही, हा महत्वपूर्ण आशय अधोरेखित करणारे तसेच मनोरूग्णांच्या सुविधा व अधिकारांवर भर देणारे, मनोरूग्ण सुरक्षा व अधिकार दुरूस्ती विधेयक राज्यसभेत १३४ दुरूस्त्यांसह मंजूर झाले..

🅾️ आरोग्यमंत्री.. :-
जे.पी. नड्डा..

🅾️ विधेयकातील तरतूदींनुसार मनोरूग्णांवर आवश्यकतेनुसार उपचार केले जातील..

🅾️महिला व लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. मानसिक दृष्टया आजारी रूग्णाला रूग्णालयात ३0 दिवस ठेवता येईल..

🅾️ तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ९0 दिवसांपर्यंत ही मुदत वाढवताही येईल..

🅾️ मानसिक रूग्णांच्या उपचारासाठी देशात सुयोग्य डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, ही बाब लक्षात घेउन वैद्यकीय अभ्यासक्रमात मनोरूग्ण चिकि त्सा अभ्यासक्रमाच्या जागाही वाढवण्यात आल्या आहेत..

🅾️  दशात मानसिक रूग्णांची संख्या नेमकी किती याचा शोध घेण्यासाठी बंगलुरूच्या निमहान्स संस्थेने सर्वेक्षण सुरू केले आहे..

🅾️ या सर्वेक्षणासाठी देशाची विभागणी ६ प्रभागांमधे करण्यात आली आहे..

🅾️ पराथमिक अंदाजानुसार देशात एकुण लोकसंख्येपैकी ६ ते ७ टक्के लोक मानसिक आजाराने कमी अधिक प्रमाणात ग्रस्त असल्याचा अंदाज आहे..

🅾️ यापैकी २ टक्के रूग्ण गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त आहेत..


No comments:

Post a Comment

Latest post

महाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढावा.

🔶 देशाचा पश्‍चिम व मध्य भाग व्यापलेल्या राज्यास अरबी समुद्राचा 720 किमी लांबीचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. पश्‍चिमेकडील सह्याद्री पर...