भारत सरकारचे ‘राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान’🔰दिनांक 15 ऑगस्ट 2020 पासून आरोग्य क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचा पुढाकार घेतला गेला आहे. “राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान” (National Digital Health Mission) या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

🔰या कार्यक्रमामध्ये तंत्रज्ञानाची खूप मोठी आणि महत्त्वाची भूमिका असणार आहे. कोणालाही औषधोपचार करताना होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी तंत्रज्ञानाची अतिशय उत्तम पद्धतीने मदत घेवून हे अभियान राबविण्यात येणार आहे.

🔰परत्येक भारतीयासाठी “हेल्थ आय.डी.”

🔰परत्येक भारतीयाला एक “हेल्थ आय.डी.” म्हणजेच विशिष्ट “आरोग्य ओळखपत्र” देण्यात येणार.

🔰या आरोग्य ओळखपत्रामध्ये प्रत्येकाच्या आरोग्याची माहिती डिजिटल माध्यमातून जमा केली जाणार.प्रत्येकाने केलेल्या आरोग्य चाचण्या, प्रत्येकाचे आजार, कोणत्या आरोग्य चाचण्या केल्या त्याविषयीची माहिती, चिकित्सकांकडून कोणते औषध घेतले, त्यांनी तुमच्या आजाराचे नेमके काय निदान केले, कधी कोणते औषध दिले, केलेल्या चाचणीचा अहवाल काय आला, अशी सगळी माहिती त्या एकाच आरोग्य ओळखपत्रामध्ये मिळू शकणार आहे.चिकित्सकांनी रूग्णालयात दाखल करण्यास सांगितले असो, पैसे जमा करावे लागणार असो, या सर्व गोष्टींचा तपशील सर्वांना मिळू शकणार आहे.

🔴भविष्यातले परिणाम...

🔰या अभियानाच्या माध्यमातून वैद्यकीय विषयक अनेक प्रश्नांतून सुटका मिळू शकणार आहे. त्यामुळे उत्तम आरोग्य मिळवताना, प्रत्येक नागरिक अगदी योग्य निर्णय घेवू शकणार. ही व्यवस्था आता देशात लवकरच उपलब्ध होणार आहे.

🔴पार्श्वभूमी...

🔰मार्च 2017 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘राष्ट्रीय आरोग्य धोरण-2017’ला मंजूरी देण्यात आली होती. त्यात आरोग्य प्रणालीमध्ये नियमन, विकास आणि डिजिटल आरोग्य सुविधा आणण्यासाठी ‘राष्ट्रीयडिजिटलआरोग्प्राधिकरण’ (NDHA) स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला गेला होता.

🔰म 2018 मध्ये डिजिटल आरोग्याविषयी भारताकडून प्रस्तावित करण्यात आलेला ठराव जिनेव्हा येथे 71 व्या जागतिक आरोग्य सभेदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) अंगिकारला गेला. डिजिटल आरोग्य तंत्रज्ञानाची सार्वत्रिक आरोग्य आच्छादनाला (UHC) मदत देण्यास प्रचंड क्षमता आहे. तसेच त्यामधून आरोग्य सेवांची उपलब्धता, गुणवत्ता वर्धित करण्यास आणि स्वस्त होण्यास मदत मिळणार. याच्याअंतर्गत आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि अन्य प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यास मदत मिळणार. तसेच डिजिटल आरोग्यासंबंधी वैश्विक धोरण आखण्यास WHOचा मार्ग प्रशस्त होतो.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...