Thursday 20 August 2020

करिडा मंत्रालयाचा राष्ट्रव्यापी ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ कार्यक्रम.



🔰कद्रीय क्रिडा मंत्रालयाकडून 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सर्वात मोठ्या देशव्यापी ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ नामक धावशर्यतीचे आयोजन केले जात आहे. लठ्ठपणा, आळस, ताणतणाव, बेचैनी आणि इतर आजारांपासून नागरिकांना मुक्त करणे आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणे हे या कार्यक्रमाचे घोषवाक्य आहे.

🔰कद्रीय क्रिडामंत्री किरेन रिजीजू यांनी 14 ऑगस्ट 2020 रोजी या उपक्रमाचे उद्घाटन केले. कोविड-19 महामारीच्या निकषांचे पालन करतानाच स्वतःला तंदुरुस्त राखण्याबाबत जनतेला प्रोत्साहित करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

🔴शर्यतीचे स्वरूप...

🔰सध्याची महामारीची स्थिती लक्षात घेऊन आणि वैयक्तिक अंतराच्या निकषांचे पालन करून या उपक्रमात सहभागी होणाऱ्या धावपटूंना त्यांच्या स्वतःच्या गतीने त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही ठिकाणी धावण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.

🔰तया व्यतिरिक्त धावपटू या अनेक दिवस धावण्याच्या उपक्रमाच्या कालावधीत मध्येच धाव खंडित करू शकतात.
धावपटूंनी कापलेले एकूण अंतर आणि त्यासाठी घेतलेला वेळ याची माहिती GPS घड्याळाच्या मदतीने किंवा स्वतः नोंदवता येऊ शकतो.15 ऑगस्टला असलेल्या देशाच्या 74व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आणि 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या 151व्या जयंतीनिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...