Thursday 20 August 2020

चालू घडमोडी



• फोर्ब्स मासिकाच्या 2020 साली सर्वाधिक मानधन मिळविणाऱ्या 100 खेळाडूंच्या यादीत असलेला एकमेव भारतीय आणि क्रिकेटपटू - विराट कोहली (क्रमांक: 66 वा).

• फोर्ब्स मासिकाच्या 2020 साली सर्वाधिक मानधन मिळविणाऱ्या 100 खेळाडूंच्या यादीत पहिला क्रमांक (पुरुष) - स्विस टेनिसपटू रॉजर फेडरर (द्वितीय: रोनाल्डो; तिसरा: लिओनेल मेस्सी).

• फोर्ब्स मासिकाच्या 2020 साली सर्वाधिक मानधन मिळविणाऱ्या 100 खेळाडूंच्या यादीत पहिला क्रमांक (महिला) - जपानी टेनिसपटू नाओमी ओसाका.

• ..............या राज्य सरकारने मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी ‘रोजगार सेतू’ योजना लागू केली आहे - मध्यप्रदेश.

• नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज (NCDEX) यांनी .............. हे भारतातले पहिला अॅग्री फ्युचर्स इंडेक्सचालू केला  - NCDEX अॅग्रीडेक्स.

• राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) याच्या कक्षेत असलेल्या JEE, NEET सारख्या परीक्षांसाठी उमेदवारांना सराव करण्यासाठी............. हे नवीन मोबाइल अॅप सुरु केले आहे. - ‘नॅशनल टेस्ट अभ्यास’ अॅप.

• गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाच्या वर्ष 2019-20 मधील कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंग यादीच्या अंतर्गत पंच तारांकित रेटिंग प्राप्त शहरे............ ही आहेत. - अंबिकापूर, राजकोट, सूरत, म्हैसूर, इंदूर आणि नवी मुंबई.

• प्रधान मंत्री वय वंदना योजना (PMVVY) यासाठी ............ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली  - 31 मार्च 2023 पर्यंत.

• 2020-21 ते 2024-25 या आर्थिक वर्षांच्या कालावधीत भारतातल्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या शाश्वत आणि जबाबदार विकासाद्वारे निल क्रांती घडविण्याची नवी योजना - प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY).

• पुढील एका वर्षासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे नवीन अध्यक्ष.................... हे आहेत. - डॉ हर्ष वर्धन (भारताचे आरोग्य मंत्री).

• राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) याचे नवे अध्यक्ष - गोविंदा राजुलू चिंतला.

• भारतीय पोलाद संघाचे (ISA) नवे अध्यक्ष - दिलीप ऊंमेन.

• .................या राज्य सरकारने शेतकऱ्यांना अधिक पिके घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी राजीव गांधी किसान कल्याण योजना जाहीर केली – छत्तीसगड.

• ..................या राज्यातल्या आदिवासीबहुल झाबुआ जिल्ह्यात ग्रामीण उपजीविका अभियानाच्या महिलांनी सुरक्षित प्रसूतीसाठी ग्रामीण महिलांसाठी दीदी वाहन सेवा सुरू केली - मध्यप्रदेश.

• भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी कोविड-19च्या निदानासाठी मान्यता दिलेली पूर्णपणे स्वदेशी निदान चाचणी पद्धत - ट्रूनॅट कोविड-19 टेस्ट.

• जैवविविधतेच्या संभाषणात तरुण पिढीचा सहभाग समाविष्ट असलेला WWF इंडिया याचा नवा उपक्रम - WWF मॉडेल कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (MCoP).

•  ‘प्रत्येकाला रोजगार मिळेल’ (Everybody will get employment) या  योजनेची घोषणा करणारे........... राज्य होय - मध्यप्रदेश.

• सप्टेंबर 2020 पासून उघडणाऱ्या "हुनर हाट" ची थीम  - "लोकल टू ग्लोबल".

• इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतीय हवामान विभाग (IMD) सेवा.................. या मोबाइल अॅपवर आणली आहे - उमंग (युनिफाइड मोबाइल अॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नेंस).

• ...........या केंद्रशासित प्रदेश सरकारने “सुकून’ - कोविड-19 बीट द स्ट्रेस” उपक्रम सुरू केला – जम्मू व काश्मीर.

• ...............या ट्रेडिंग व्यासपीठाने कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज क्षेत्रात 'गोल्ड मिनी ऑप्शन्स' बाजारात सादर करण्याची घोषणा केली - नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE).

• ऑटोमॅटिक कंट्रोल अँड डायनामिक ऑप्टिमायझेशन सोसायटी याद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित एपीजे अब्दुल कलाम मेमोरियल इंटरनेशनल ट्रॅव्हल अवॉर्ड या पुरस्काराचे विजेता - डॉ. तौसिफ खान एन. (एसआरएम युनिव्हर्सिटी, आंध्रप्रदेश).

• आंतरराष्ट्रीय जाहिरात संघ (IAA) यांचा "2020 यंग लीडर कंपास अवॉर्ड" या पुरस्काराचे विजेता - अनंत गोयंका (इंडियन एक्सप्रेस ग्रुप).

• भारतीय कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या नावावरून ..............या देशाने राजधानीतल्या रस्त्याला नाव दिले - इस्त्रायल.

• .....................या देशाच्या अध्यक्षतेत ‘कोविड-19 महामारी विषयक शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आभासी परिषद’ पार पडली - रशिया.

• आदिवासी तरुणांना डिजिटल माध्यमातून मार्गदर्शनासाठी तयार केलेला नवीन कार्यक्रम - “गोल (गोइंग ऑनलाईन अॅज लीडर्स)”.

• भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाचे नवे महासंचालक - व्ही. विद्यावती.

• पश्चिम बंगाल सरकारने 6 जिल्ह्यात 50,000 एकर नापीक जमीन वापरात आणण्यासाठी तयार केलेली योजना - ‘मतीर स्मृस्ती’

• ................या राज्य सरकारने शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत मोफत शिक्षण मिळविण्यासाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाख रुपयांवरून अडीच लाखांपर्यंत वाढविली आहे. – राजस्थान.

• ...............हे राज्य सरकार महत्वाकांक्षी राजीव गांधी किसान न्याय योजना 21 मे पासून राज्यात लागू करणार आहे - छत्तीसगड.

• डिजिटल / ऑनलाइन शिक्षणापर्यंत बहू-पद्धतीने प्रवेश मिळविण्यासाठी भारत सरकारचा............... हां नवा कार्यक्रम आहे. – पीएम ई-विद्या (PM eVIDYA).

• 2025 सालापर्यंत प्रत्येक मुलाने इयत्ता 5 वीच्या शिक्षणाची पातळी गाठली पाहिजे याची खात्री करुन घेण्यासाठी राष्ट्रीय मूलभूत साक्षरता व संख्याशास्त्र अभियान...............पर्यंत सुरू केले जाणार आहे. - डिसेंबर 2020.

• 2020 साली जागतिक उच्च रक्तदाब दिनाची (17 मे) ............. ही होती. - "मेजर युवर ब्लड प्रेशर, कंट्रोल इट, लिव लॉन्गर".

• उपग्रहांच्या संरक्षणासाठी ‘स्पेस ऑपरेशन्स स्क्वॉड्रॉन’ नावाने नवीन अंतराळ संरक्षण दल तयार करणारा.......... हा देश आहे.– जापान.

• ..............या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने 18 मे 2020 रोजी पहिल्या आभासी आणि 73 व्या जागतिक आरोग्य सभेचे उद्घाटन झाले - इस्रायल देशाचे पंतप्रधान ज्यांनी 17 मे रोजी पाचव्या वेळी शपथ घेतली - बेंजामिन नेतन्याहू

• 2020 साली जागतिक मधमाशी दिन (20 मे) याची संकल्पना - “बी एनगेज्ड”.
•  ...................देशाने भारतीय राज्यांतल्या लिम्पीयाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी या विवादित प्रदेशांचा समावेश करीत नवीन राजकीय नकाशाला मान्यता दिली - नेपाळ.

• .................हा देश 2020-21 या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी समितीचे अध्यक्षपद भूषविणार आहे. - भारत (जपानच्या जागी).

• कोविड-19 महामारीपासून मुक्त होणारा युरोपमधला पहिला देश............. हा होय - स्लोव्हेनिया.

• भारतीय जलशास्त्र (hydrography) आणि संपूर्ण हिंद महासागराच्या क्षेत्रात त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी ब्रिटनच्या अलेक्झांडर डॅलरिम्पल पुरस्काराने सन्मानित झालेल्या भारतीय – वाइस अॅडमिरल विनय बढवार (भारत सरकारचे राष्ट्रीय जलशास्त्रज्ञ).

• ................या संस्थेनी कोविड-19 तपासणीसाठी कमी किंमतीची RT-PCR ची नवीन चाचणी विकसित केली आहे जी केवळ एक तास आणि 45 मिनिटांत परिणाम देते - AIIMS, रायपूर.

• भारतीय नौदलाचे............ हे जहाज मालदीव, मॉरिशस, सेशल्स, मेडागास्कर आणि कोमोरोस या देशांना ‘सागर अभियान’ याच्या अंतर्गत अन्न, औषधे पुरविण्यासाठी रवाना झाले होते. – INS केसरी.

• कोविड-19 प्रकरणांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर वैद्यकीय व्यवसायिकांना मदत करण्याकरीता भारत सरकारने ...............या आखाती देशात 88 परिचारिकांची पहिली तुकडी पाठवली होती. - संयुक्त अरब अमिराती (UAE).

• तंत्रज्ञान विकास मंडळ आणि भारतीय उद्योग संघ (CII) यांच्या वतीने 11 मे 2020 रोजी ...........या शहरात ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला पुनर्चालना (RESTART)’ विषयक एक उच्चस्तरीय डिजिटल परिषद आयोजित केली होती. - नवी दिल्ली.

• भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ आणि............... या स्वयंसेवी संस्थेने आदिवासी उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार केला - आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन.

• ................या राज्य सरकारने प्रवासी कामगारांना मदत करण्यासाठी ‘प्रवासी राहत मित्र’ अॅप तयार केले - उत्तरप्रदेश.

• 2020 साली आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन (12 मे) याची संकल्पना - "नर्सेस: ए वॉइस टू लीड – नर्सिंग द वर्ल्ड टू हेल्थ".

• भारतीय महारजिस्ट्रार कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, .............या राज्याने 4 एवढ्या बालमृत्यू दरासह सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे - नागालँड.

• ..............या अभियानाचा भाग म्हणून राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) तिरुचिराप्पल्ली येथे एक अत्याधुनिक महासंगणक स्थापन केले जाणार आहे - नॅशनल सुपरकंप्यूटिंग मिशन.

• ‘फायनान्शियल टाईम्स एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन 2020’ याच्या जागतिक क्रमवारीत .............या भारतीय संस्थेने 50 अग्रगण्य संस्थांमध्ये जागा मिळवली – भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM), बंगळुरू (45 व्या क्रमांकावर).

• 2020 वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्सचे भारत आणि मध्य आशियामधले सर्वोत्कृष्ट क्षेत्रीय विमानतळ म्हणून स्कायट्रॅक्स पुरस्कार विजेता - केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळूरू.

• आशिया/ओशिनिया क्षेत्रासाठी फेड कप हार्ट अवॉर्ड 2020 जिंकणारी प्रथम भारतीय खेळाडू  - सानिया मिर्झा (टेनिसपटू).

• युरोप/आफ्रिका क्षेत्रासाठी फेड कप हार्ट अवॉर्ड 2020 याचा विजेता - अॅनेट कोन्टाविट (एस्टोनिया).

• भारतातले........... या राज्याने  ‘FIR आपके द्वार योजना’ लागू केली - मध्यप्रदेश.

• सूक्ष्म उद्योगांची नवीन व्याख्या - गुंतवणूक: रु. 1 कोटीपेक्षा कमी आणि उलाढाल: रु. 5 कोटी.

• लघू उद्योगांची नवीन व्याख्या - गुंतवणूक: रु. 10 कोटी आणि उलाढाल: रु. 50 कोटींपेक्षा कमी.

• मध्यम उद्योगांची नवीन व्याख्या - गुंतवणूक: रु. 20 कोटी आणि उलाढाल: रु. 100 कोटी.

• जागतिक आर्थिक मंचाच्या जागतिक 'एनर्जी ट्रांजिशन इंडेक्स 2020'मध्ये भारताचा क्रमांक - 74 वा.
       (जागतिक आर्थिक मंचाच्या जागतिक 'एनर्जी ट्रांजिशन इंडेक्स 2020'मध्ये प्रथम क्रमांक - स्वीडन (त्याच्या पाठोपाठ   स्वित्झर्लंड व फिनलँड)

• देशात पहिल्यांदाच, ...............या राज्यात रेल्वे आणि टपाल खात्याने दरवाजावर वितरण सेवा प्रदान करण्यासाठी हातमिळवणी केली आहे - केरळ.

• भारतीय भुदलाचा युवकांसाठी तीन वर्षांचा इंटर्नशिप कार्यक्रम - ‘टूर ऑफ ड्युटी’.


• ...............या देशाचे नौदल हवाईमध्ये ‘रिम ऑफ द पॅसिफिक’ सराव आयोजित करणार आहे – अमेरिका.

• बौद्धिक संपदा फ्रेमवर्क संदर्भात सुधारणांच्या अभावासाठी .............या देशाने भारताला 'प्रियोरिटी वॉच लिस्ट'मध्ये ठेवले – अमेरिका.

• NASA संस्थेच्या पहिल्या मंगळ हेलिकॉप्टरला अधिकृतपणे “इंजेन्यूटी” नाव देण्यात आले आहे जे ..............या 17 वर्षीय भारतीय मुलगीने सुचविले - वनिझा रुपाणी.

• ओपन बजेट सर्वे 2019’ याच्यानुसार, अर्थसंकल्पीय पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या बाबतीत भारताचे स्थान............. वे आहे. - 53 वा.

• ‘ओपन बजेट सर्वे 2019’ याच्यानुसार, अर्थसंकल्पीय पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या बाबतीत पहिले स्थान - न्यूझीलंड.

• 2020 साली आंतरराष्ट्रीय पत्र स्वातंत्र्य दिनाची (3 मे) संकल्पना - “जर्नलिजम विदाउट फियर ऑर फेवर”.

• 18 ते 20 ऑक्टोबर या काळात .................या ठिकाणी जागतिक पत्र स्वातंत्र्य परिषद 2020 आयोजित केली जाणार आहे – द हेग, नेदरलँड.

• ..................हा देश एव्हरेस्ट पर्वताची उंची मोजण्यासाठी नवीन सर्वेक्षण करीत आहे - चीन.

• फिलिपीन्समधील आशियाई विकास बँक (ADB) येथे प्रधान कार्यकारी समन्वय विशेषज्ञ म्हणून नियुक्त केले गेलेले भारतीय - निलय मिताश.

• फोर्ब्स मासिकाच्या अब्जाधीश राजकारणींच्या वर्ष 2020च्या यादीत समावेश असलेली एकमेव भारतीय  महिला - सावित्री जिंदाल (क्रमांक: 349; संपत्ती: सुमारे 4.6 अब्ज डॉलर).

• जर्मनीच्या ड्यूश वेले या संस्थेचा ‘फ्रीडम ऑफ स्पीच’ पुरस्कार प्राप्त करणारे भारतीय - सिद्धार्थ वरदराजन (द वायर या संस्थेचे संपादक).

• शहरी भागात राहणाऱ्यांना किमान 120 दिवसांच्या रोजगाराची हमी देणारी मुख्यमंत्री शहरी रोजगार गॅरंटी योजना............ या राज्य सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतला - हिमाचल प्रदेश.

• भारतीय विमा नियंत्रण व विकास प्राधिकरणाने (IRDAI) सर्व विमाधारकांद्वारे दिले जाऊ शकणारे विमा मध्यस्थांसाठी मानक व्यवसायिक नुकसानभरपाई धोरणाचा आराखड़ा तयार करण्यासाठी................ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली - यज्ञप्रिया भारत.

• 4 एप्रिल 2020 रोजी कोविड19 विषयक नॉन अलाइन्ड मुव्हमेंट (NAM) यांची आभासी परिषद.............. यांच्या  अध्यक्षतेखाली आयोजित केली गेली - अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हम अलीयेव.

• 4 एप्रिल 2020 रोजी आभासी ‘कोरोनाव्हायरस ग्लोबल रिस्पॉन्स इंटरनॅशनल प्लेजिंग कॉन्फरन्स’ आयोजित करणारे देश – ब्रिटन आणि इतर आठ देश.

• केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते .............या व्यासपीठावर “द सरस कलेक्शन” उपक्रम आरंभ करण्यात आला - गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM).

• महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत राज्यातली जवळपास 100 टक्के लोकसंख्या विमा संरक्षणाखाली आणणारे पहिले राज्य........... हे होय  - महाराष्ट्र.


• रशिया सरकारने नव्या घटनात्मक दुरुस्तीने रशियाचे विद्यमान राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे ..............या वर्षापर्यंत देशाचे नेतृत्व करणार आहे  – वर्ष 2036.

• ................... हा देश 2023 साली पहिला पर्यटक अंतराळात पाठवणार आहे - रशिया.

• सांख्यिकी दिन 2020 निमित्त, सांख्यिकी क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी............. यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. :- - सी. रंगराजन (RBIचे माजी गव्हर्नर).

• आगामी 2020-21 हंगामात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या प्रमुख पंच समितीत समावेश झालेले सर्वात तरुण व्यक्ती............... ही आहे. - नितीन मेनन (36 वर्षीय)

• राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी उत्तरप्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे .............या राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सोपवला  - मध्यप्रदेश.

• ...............या राज्य सरकारने 'प्लॅटिना' नावाचा कॉन्व्हॅलेसेंट प्लाझ्मा थेरपी-कम-ट्रायल प्रकल्प सुरू केला, जो जगातला सर्वात मोठा प्रकल्प आहे - महाराष्ट्र.

• ..................हे मंत्रालय 28 जून ते 12 जुलै 2020 या कालावधीत ‘संकल्प पर्व’ कार्यक्रम राबवित आहे, ज्यांच्या अंतर्गत वड, पिंपळ, आवळा, अशोक आणि बेल ही पाच झाडे लावण्यात येणार आहे - सांस्कृतिक मंत्रालय.

• .................या राज्य सरकारने ‘विशेष सुरक्षा दल’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे - उत्तरप्रदेश.

• ...................हे राज्य सरकार 1 जुलैपासून ‘आदर्श पोलीस स्टेशन’ योजना लागू करणार आहे - छत्तीसगड.

• .................या राज्य सरकारने गर्भवती व स्तनपानावर असलेल्या महिलांना पोषक आहार उपलब्ध करून देण्यासाठी ‘मुख्यमंत्री मातृ पुष्टी उपहार योजना’ जाहीर केली आहे. - त्रिपुरा.

• 25-26 जून 2020 रोजी CII संस्थेनी .................या राज्यात आभासी ‘संरक्षण परिषद 2020’ आयोजित केली - गुजरात.

• नीती आयोगाची वर्तन बदल मोहीम - ‘नॅव्हिगेटिंग द न्यू नॉर्मल’.

• केंद्रीय पंचायतराज मंत्रालय द्वारे स्थापित, विविध ऑनलाईन सेवा पुरवण्यासाठी ‘ई-पंचायत पुरस्कार 2020’ याचा विजेता असलेले राज्य  - हिमाचल प्रदेश.

• स्टार्टअप जिनोम संस्थेच्या ‘द ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम रिपोर्ट 2020’ याच्यानुसार, जागतिक स्तरावरील यशस्वी स्टार्टअप तयार करण्यासाठी जगातल्या सर्वाधिक अनुकूल शहरांच्या यादीत प्रथम 40 मध्ये स्थान मिळविणारी दोन भारतीय शहरे - बंगळुरू (26 वा) आणि दिल्ली (36 वा).

• इंडियन रेड क्रॉस सोसायटीद्वारे विकसित केलेले........... हे नवीन मोबाइल अॅप आहे. - ‘ईबल्डसर्विसेस’

• 2019 साली राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारी सर्वात लहान राज्ये ......... ही आहेत छोटी - नागालँड आणि त्रिपुरा.(2019 साली राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारी 50 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेली राज्ये - गुजरात, आंध्रप्रदेश आणि हिमाचल प्रदेश. तर  2019 साली राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे केंद्रशासित प्रदेश - दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव.)

• समलिंगी समुदायासाठी नोएडाच्या सेक्टर 50 मेट्रो स्टेशनला समर्पित केल्यानंतर नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (NMRC) त्याचे नाव................ हे ठेवले - "रेनबो" स्टेशन.

•  ‘ज्युरी कमिटी स्पेशल अवॉर्ड’ श्रेणीत ‘संसद रत्न पुरस्कार 2020’ पुरस्काराने गौरविण्यात आलेला........... हा सर्वात तरुण खासदार – के. राम मोहन नायडू (श्रीकाकुलम खासदार).

• महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव - संजय कुमार (अजोय मेहता यांच्या जागी)

• २०२०  चा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार.............. यांना जाहीर झाला आहे  जिंकणारे - डॉ. तात्याराव लहाने (वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक व नेत्ररोग तज्ज्ञ).


• 17-21 ऑगस्ट 2020 या काळात होणाऱ्या शस्त्रास्त्रे व्यापार संधिच्या सदस्य देशांची सहावी परिषद (CSP6)........... येथे आयोजित केली आहे :-  जिनिव्हा, स्वित्झर्लंड.

• भारताबाहेर जगातले पहिले योग विद्यापीठ............ येथे स्थापन करण्यात आले.:- - विवेकानंद योग विद्यापीठ, लॉस एंजेलिस, अमेरिका.

• जागतिक स्तरावर, ताज्या ‘QS नेक्स्ट 100 अंडर 50' रॅंकिंग 2021’ यात प्रथम स्थान - सिंगापूरचे नानयांग टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी.

• केंद्रीय मंत्रीमंडळाने................. या राज्यातल्या कुशीनगर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषित करण्याला मान्यता दिली - उत्तरप्रदेश.

• ताज्या ‘QS नेक्स्ट 100 अंडर 50' रॅंकिंग 2021’ यात स्थान मिळविणाऱ्या चार भारतीय संस्था.................... या आहेत  - IIT गुवाहाटी, IIT हैदराबाद, हैदराबाद विद्यापीठ आणि ओपी जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी.

• ..................या राज्य सरकारने गरजू लोकांना शिजवलेले भोजन पुरवण्यासाठी ‘इंदिरा रसोई योजना’ लागू केली - राजस्थान.

• महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या 2018-19 या वर्षासाठीच्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार .............. यांना जाहिर करण्यात आला :-  ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर.

• महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या 2018-19 या वर्षासाठीच्या संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ............... यांना जाहिर झाला आहे.:- ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री मधुवंती दांडेकर.

• भारत आणि अमेरिका खंडातला ................हा देश ‘ट्रॅव्हल कॉरिडोर’ तयार करण्याच्या योजनेवर काम करीत आहे ज्यामुळे दोन्ही देशातल्या प्रवासावरील निर्बंध कमी होतात  – संयुक्त राज्ये अमेरिका.

• केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी उच्च शिक्षण संस्थांमधल्या संगोपणाखालील स्टार्टअप उद्योगाना मदत करण्यासाठी ................या उपक्रमाची सुरूवात केली – ‘युक्ती 2.0' (Young India combating COVID with Knowledge, Technology and Innovation).

• ‘हरुन रिच लिस्ट 2020’ यादीनुसार जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती - जेफ बेझोस (अॅमेझॉन). (हरुन रिच लिस्ट 2020’ यादीनुसार 9 व्या क्रमांकावर असलेले भारतीय - मुकेश अंबानी (रिलायन्स इंडस्ट्रीज)

•  ‘कोरोनिल’ नावाने कोविड-19 आयुर्वेद औषध तयार करणारी कंपनी - पतंजली आयुर्वेद.

• एकूण बाजार भांडवलाच्या बाबतीत जागतिक स्तरावरील सूचीबद्ध कंपन्यांच्या यादीत 57 व्या क्रमांकावर असणारी पहिली भारतीय कंपनी............... ही होय  - रिलायन्स इंडस्ट्रीज (150 अब्ज डॉलर).

• “डिकार्बनायझिंग ट्रान्सपोर्ट इन इमर्जिंग इकॉनॉमीज” या उपक्रमात............... हे देश सहभागी झाले होते. - अर्जेंटिना, अझरबैजान, भारत आणि मोरोक्को.

• एकूण बाजार भांडवलाच्या बाबतीत जागतिक स्तरावरील सूचीबद्ध कंपन्यांच्या यादीत प्रथम क्रमांकावर असणारी कंपनी - सौदी अरामको, सौदी अरब (1764.5 अब्ज डॉलर).

• 11 लक्ष कोटी रुपये एवढे बाजार भांडवल गाठणारी.................. ही पहिली भारतीय कंपनी  ठरली.- रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड.

• महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या “अभय” नावाच्या उपक्रमासाठी “आत्मनिर्भर भारत 65 वा राष्ट्रीय SKOCH पुरस्कार 2020” जिंकणारे - सिद्धार्थ कौशल (प्रकाशम जिल्हा पोलिस अधीक्षक).

• .............. या राज्य सरकारने कल्पनाक्षम शिक्षणासाठी ‘एकतू खेलो, एकतू पढो’ नावाचा एक उपक्रम जाहीर केला - त्रिपुरा.

• 2020 साली आंतरराष्ट्रीय योग दिनाची (21 जून) संकल्पना ................... ही होती.- "योग फॉर हेल्थ – योग अॅट होम".

• २१ जून 2020 रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक जल-सर्वेक्षण दिनाची संकल्पना ................ ही होती.- “हायड्रोग्राफी एनेबलिंग ऑटोनोमस टेक्नॉलजीज”.

• जागतिक संगीत दिन ................ रोजी साजरा केला जातो.- 21 जून.

• नॅशनल एयरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या ग्रहाच्या ‘ट्रायडंट’ नावाच्या सर्वात मोठ्या चंद्राचा शोध घेण्यासाठी मोठा ‘ट्रायडंट’ मोहीम पाठविणार आहे - नेपच्यून.

• फुटबॉलमध्ये ‘महिला आशिया चषक 2020’ स्पर्धेचा यजमान देश.............. हा होय. - भारत.


• ऑगस्ट 2021 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षपद ................. या देशांकडे असणार आहे.:- - भारत.

• आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पर्यटन मंत्रालयाच्या आठवडाभराच्या समारंभाची सुरुवात 15 जूनला सोशल मीडियावरील कार्यक्रमांमधून झाली, जे ..............या विषयावर तयार केले गेले आहेत - “योग @ होम अँड योग विथ फॅमिली”.

• ऑन-डिमांड म्हणून सादर केलेली.............. ही भारताची पहिली क्लाऊड सर्व्हिस - डेटा समुद्र, बेंगळुरू (टेलीइंडियाची उपकंपनी).

• 21 जून रोजी संगीताच्या माध्यमातून ‘स्पिरिट ऑफ योग’ नावाचा योग उत्सव ...........या संस्थेच्या वतीने जगभरातल्या भारतीय मिशनद्वारे सुरू केला जाणार आहे - भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR).

• “ए सॉन्ग ऑफ आइस अँड फायर” मालिकेसाठी सायन्स फिक्शन श्रेणीत ‘टेरन प्राइज’ पुरस्कार.............. यांनी  जिंकला आहे. - मौरिस ह्याईम्स (मुंबईत जन्मले).

• बनारसी पान, बनारसी लंगडा (आंबा), बाराबंकी हातमाग यासाठी GI टॅग प्राप्त करणारे  भारतातील राज्य - उत्तरप्रदेश.

• BP कंपनीच्या अहवालानुसार, वर्ष 2019 मध्ये जगातल्या प्राथमिक ऊर्जेचा सर्वाधिक वापर करणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक........... वा लागतो  – द्वितीय (प्रथम: चीन).

• वर्ष 2021-22 या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी आशिया-प्रशांत प्रदेशातून संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) ...........या देशाचा नवनियुक्त तात्पुरता सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे :- भारत (आठव्यांदा).

• वर्ष 2021-22 या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) याचे नवनियुक्त तात्पुरते सदस्य.......... हे आहेत:- भारत, आयर्लंड, मेक्सिको आणि नॉर्वे.

• संयुक्त राष्ट्रसंघ महासभेचे (UNGA) नवनियुक्त अध्यक्ष........... हे आहेत.:- वोल्कन बोजकिर (तुर्की मुत्सद्दी).

• भारताची पहिली फिरती कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा........... ही आहे : – इनफेक्शीयस डिसीज डायग लॅब लॅब (I-LAB).

• 24 जून 2020 रोजी........... या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या विजय दिनाच्या पथ संचलनामध्ये भाग घेण्यासाठी 75 सदस्यांचे भारतीय त्रि-सेवा पथक पाठविण्याला भारताने सहमती दर्शविली होती. - मॉस्को, रशिया.

• व्यवसायिक ड्रोन ऑपरेटरसाठी भारतातले पहिले विमा संरक्षण प्रदान करणारी........... ही  कंपनी आहे. -HDFC एर्गो (ट्रोपोगोच्या भागीदारीत).

• ...............या ठिकाणी 10 हजार खाटांचे जगातली सर्वात मोठी कोरोनाव्हायरस रुग्णालय सुविधा उभारण्यात आले आहे - दिल्ली (राधा सोआमी अध्यात्मिक केंद्रात).

• जर्मन पबलिशर्स अँड बूकसेलर असोसिएशन द्वारे सादर केलेल्या ‘2020 पीस प्राइज ऑफ द जर्मन बूक ट्रेड’ या पुरस्काराचे विजेते ........... हे आहे. - अमर्त्य सेन (नोबेल पुरस्कार विजेते भारतीय अर्थशास्त्रज्ञ).

• .................हे राज्य सरकार फेस मास्क घालण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ‘मास्क दिन’ म्हणून पाळणार आहे - कर्नाटक.

• बिहार खादीचे ब्रँड अॅम्बेसेडरम्हणून ................ यांची निवड करण्यात आली आहे. - अभिनेता पंकज त्रिपाठी.

• ...................या संस्थेच्या संशोधकांनी संघटनांना कामाची जागा कोविड-10 विषाणूपासून संरक्षित करण्यात मदत करण्यासाठी ‘वर्कप्लेस रेडीनेस इंडिकेटर’ विकसित केले आहे - भारतीय विज्ञान संस्था (IISc) बेंगळुरू.

• 2020 साली ‘जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन’ची संकल्पना............. ही होती. - “फूड.फीड.फायबर. – द लिंक्स बिटविन कन्जम्पशन अँड लँड”.

• UNCTADच्या ‘जागतिक गुंतवणूक अहवाल 2020’नुसार, 2019 साली भारतात झालेली FDI गुंतवणूक – 51 अब्ज डॉलर (20 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ).

• .............ही संस्था चीन, जपान, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलँड आणि व्हिएतनाम या देशांना जोडणारी उच्च-कार्यक्षम पाण्याखालून इंटरनेट केबल टाकत आहे - एशिया डायरेक्ट केबल (ADC) कन्सोर्टियम.

• इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD) यांच्या ‘जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2020’च्या अहवालानुसार भारताचा ............. वा क्रमांक लागतो. - 43 वा.


No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...