Thursday 1 October 2020

बिहारच्या निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त; केंद्रीय पोलिसांच्या 300 कंपन्या राहणार तैनात.


🔰विविध कारणांसाठी यंदा चर्चेत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी तगडा बंदोबस्त असणार आहे.यासाठी सुरुवातीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 300 कंपन्या पाठवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहेत.


🔰याशिवाय लवकरच ITBP, CISF, CRPF, SSB, RPF and BSF च्या तुकड्याही पाठवण्यात येणार आहेत. तीन टप्प्यात या निवडणुका पार पडणार  आहेत.बिहारच्या 243 सदस्यीय विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.


🔰राज्यात तीन टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान 28 ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यातील 3 नोव्हेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...