Thursday 1 October 2020

जगातली सर्वात पहिली वेबसाईट अद्यापही सुरू.


🅾️जगातली सर्वात पहिली वेबसाइट अद्यापही सुरू असल्याची माहिती पब्लिक डोमेनमधून समोर आली आहे. ही   वेबसाइट ब्रिटिश कॉम्प्युटर वैज्ञानिक टिम बर्नर्स ली यांनी 6 ऑगस्ट 1991 साली बनवली होती. ते युरोपियन आण्विक संशोधन संघटनेचे संशोधक होते. संशोधनाअंती त्यांनी या वेबसाइटची निर्मिती केली. 


🅾️ली यांनी ही वेबसाइट वर्ल्ड वाइड वेबच्या प्रोजेक्टसाठी समर्पित केली होती. बर्नर लींच्या पुढच्या कॉम्प्युटरसाठी ही वेबसाइट डिझाइन करण्यात आली. ही वेबसाईट वेबच्या मूलभूत वैशिष्ट्यांचं महत्त्व अधोरेखित करते. यासोबतच वेबसाइटमधून कॉम्प्युटरच्या माध्यमातून कागदपत्रं कशी मिळवायची आणि सर्व्हरचं सेटअप कशा  पद्धतीनं करता येते, याबाबत माहिती दिली आहे. 


🅾️विशेष म्हणजे ही बेवसाइट अद्यापही सुरूच आहे. वेब ब्राऊझरच्या अॅड्रेसबारवर ही   www.line-mode.cern.ch  लिंक टाकल्यास आजही ही वेबसाइट पाहायला मिळते. ही वेबसाईट तुम्हाला वर्ल्ड वाइड वेबसंदर्भात माहिती पुरवते. इंटरनेटच्या महाजालात या वेबसाइटचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. या वेबसाइटमुळेच यूआरएलएसच्या साहाय्यानं तुम्हाला डॉक्युमेंट आणि पेजेसची माहिती मिळवता येत असल्याचं समजतं आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...