Wednesday 14 October 2020

राज्‍यसभा



घटकराज्‍ये व संघराज्‍य क्षेत्रांचे राज्‍यसभा प्रतिनिधित्‍व करते. कलम 80 मध्‍ये राज्‍यसभेच्‍या स्‍थापनेविषयी माहि‍ती देण्‍यात आली आहे.


रचना:- राज्‍यसभेची कमाल सदस्यसंख्‍या 250 इतकी असते. यापैकी 238 सभासद घटकराज्‍ये व संघराज्‍य क्षेत्रांचे प्रतिनिधी असतात, तर उरलेल्‍या 12 नामवंत व्‍यक्‍तींची नियुक्‍ती साहित्‍य, विज्ञान, कला व समाजसेवा या क्षेत्रांतून राष्‍ट्रपतींद्वारा केली जाते. सध्‍या राज्‍यसभेत 245 सदस्‍य आहेत. त्‍यापैकी 233 घटकराज्‍य व संघराज्‍याचे प्रतिनिधित्त्व करतात तर, 12 सदस्‍यांची नेमणूक राष्‍ट्रपतीमार्फत केली जाते. महाराष्‍ट्रातून राज्‍यसभेवर 19 सदस्‍य पाठवले जातात.


पात्रता :- राज्‍यसभेच्‍या सदस्‍यत्त्वासाठी खालील पात्रता असणे आवश्‍यक आहे.


1)  तो भारताचा नागरिक असावा.


2)  त्‍याच्‍या वयाची 30 वर्षे पूर्ण झालेली असावीत.


3)  संसदेने वेळोवेळी कायदा करून निश्चित केलेल्‍या अटी त्‍याने पूर्ण केलेल्‍या असाव्‍यात.


सदस्‍यांची निवड :- राज्‍यसभेच्‍या सदस्‍यांची निवड घटकराज्‍यांच्‍या विधानसभेच्‍या सदस्‍यांकडून गुप्‍त मतदान पद्धतीने केली जाते.


कार्यकाल :- राज्‍यसभा हे स्‍थायी सभागृह आहे. तिचे विसर्जन होत नाही. राज्‍यसभेचे 1/3 सभासद त्‍यांच्‍या जागी नव्‍याने निवडले जातात. सामान्‍यत: राज्‍यसभेच्‍या सदस्‍यांची मुदत 6 वर्षे असते.


राज्‍यसभेतील राज्‍यनिहाय जागा :-


आंध्रप्रदेश (11)


आसाम (7)


अरुणाचल (1)


बिहार (16)


छत्तीसगड (5)


गोवा (1)


गुजरात (11)


हरियाणा (5)


हिमाचल प्रदेश (3)


जम्‍मू - काश्‍मीर (4)


झारखंड (6)


      कर्नाटक (12)


केरळ (9)


मध्‍यप्रदेश (11)


महाराष्‍ट्र (19)


मणिपूर (1)


मेघालय (1)


मिझोराम (1)


नागालँड (1)


ओडिशा (10)


पंजाब (7)


राजस्‍थान (10)


सिक्किम (1)


तामिळनाडू (18)


तेलंगणा (7)


त्रिपुरा (1)


उत्तरप्रदेश (31)


पश्चिम बंगाल (16)


उत्तराखंड (3)


दिल्‍ली (3)


पुड्डुचेरी (1)

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...