निरांचल प्रकल्प:१) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविल्या जाणा-या "निरांचल" प्रकल्पाला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने ०७ ऑक्टोबर २०१५ रोजी मान्यता दिली. 

.

२) ह्या प्रकल्पाचा एकूण खर्च २१४२.३० कोटी रुपये असून हा प्रकल्प महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, मध्यप्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि तेलंगाना ह्या ९ राज्यात राबविण्यात येणार आहे.


३) ह्या प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी ५०% खर्च शासन तर ५० % जागतिक बँकेकडून मिळणा-या कर्जातून होणार आहे. 

.

४) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील पाणलोट क्षेत्राची महत्वाची उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी, प्रत्येक शेतीला सिंचन सुविधा पुरविण्यासाठी "निरांचल" प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. 

.

५) ह्या प्रकल्पामुळे पर्जन्यावर आधारित कृषी उत्पादकतेत आणि दुग्ध उत्पादनात वाढ होणार आहे.

प्रकल्पाची उद्दिष्ट्ये

६) भारतातल्या पाणलोट आणि पावसावर आधारित कृषी व्यवस्थापनाच्या पद्धतीत संस्थात्मक बदल घडविणे. 

.

७) पाणलोट उपक्रमाच्या खात्रीसाठी आणि पावसावर आधारित व्यवस्थापन पद्धतीवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करता यावे म्हणून यंत्रणा उभारणे. 

.

८) पाणलोट आधारित दृष्टीकोनाच्या माध्यमातून समता, उपजीविका, आणि उत्पन्न यात सुधारणा घडविण्यासाठी सहाय्य करणे. 

.

९) सर्वसमावेशकता आणि स्थानिक सहभाग ह्यावर भर देणे. 

.

१०) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या सर्व घटकासाठी विशेषतः पाणलोट क्षेत्राला तांत्रिक सहाय्य पुरविणे.जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक २०१५१) World Economic Forum (WEF) ह्या संस्थेनुसार प्रसिद्ध केलेल्या जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकानुसार भारताने जगातील १४० देशांच्या यादीत ५५ वे स्थान पटकावले आहे. like emoticon


२) २०१४ मध्ये भारत ७१ व्या क्रमांकावर होता.


३) भारतातील आर्थिक वाढ, संस्थांच्या स्पर्धात्मकतेत सुधारणा, पायाभूत सुविधामध्ये सुधारणा, ह्या कारणामुळे भारत ५५ व्या स्थानावर आहे.


४) या अहवालानुसार प्रथम पाच देश 


१) स्वित्झर्लंड 

२) सिंगापूर

३) युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका 

४) जर्मनी 

५) नेदरलँड्स


विकसनशील देशांचे स्थान

५) चीन (२८) वा, दक्षिण आफ्रिका (४९) वा आणि भारत (५५) वाग्रामीण भारत (जणगणना २०११ नुसार)१) देशातील खेड्यांची संख्या : ६४०८६७ 

२) देशातील ग्रामीण लोकसंख्या : ८३.३० कोटी

.

३) देशातील लोकसंख्येचे देशातील एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण : ६८.८४ % 

.

४) ग्रामीण भागातील साक्षरता प्रमाण : ६८.९० % 

.

५) २००१ ते २०११ ह्या कालावधीत ग्रामीण लोकसंख्येत झालेली घट : -५.९ % 

.

६) ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर : ९४७ (१००० पुरुषामागे) 

.

७) ग्रामीण लोकसंख्येबाबत आघाडीची राज्ये : उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल 

.

८) ग्रामीण लोकसंख्येबाबत मागे पडलेली राज्ये : सिक्कीम, मिझोराम, गोवा 

.

९) ग्रामीण लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण : 

.

अ) हिमाचल प्रदेश (८९.९६ %) 

.

ब) बिहार (८८.७० %) 

.

क) आसाम (८५.९२ %) 

.

१०) ग्रामीण लोकसंख्येचे सर्वात कमी प्रमाण : 

.

अ) गोवा (३७.८३ %) 

.

ब) मिझोराम (४८.४९ %) 

.

क) तामिळनाडू (५१.५५ %) 

.

११) महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्या : ६.१ कोटी 

.

१२) २००१ ते २०११ ह्या कालावधीत ग्रामीण लोकसंख्येत झालेली घट : -४.९१ % 

.

१३) महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण : ५७.५७ % 

.

१४) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील साक्षरता प्रमाण : ८३.३९ % 

.

१५) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर : ९४८ (१००० पुरुषामागे)

No comments:

Post a Comment

Latest post

ZP पद भरती Strategy

📌📌 Strategy📌📌                मागचे तीन दिवस आयबीपीएस(IBPS) ने पशुसंवर्धन विभागासाठी परीक्षा घेतल्या. या परीक्षांमधील मराठी आणि इंग्लिश...