Wednesday 9 December 2020

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना


🔖केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘आत्मनिर्भर भारत रोजगार योजना’ (ABRY) याला आपली मंजूरी दिली. औपचारिक क्षेत्रात रोजगार वाढविण्यासाठी आणि ‘आत्मनिर्भर भारत पॅकेज 3.0’ अंतर्गत कोविड-19 महामारीच्या धक्क्यातून व्यवस्था बाहेर काढण्यासाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही योजना आहे.


📍ठळक वैशिष्ट्ये....


🔖ही योजना वर्ष 2020 ते वर्ष 2023 या कालावधीत लागू राहणार. योजनेच्या अंमलबजावणीसाठी 22810 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.


🔖1 ऑक्टोबर 2020 रोजी किंवा त्यानंतर 30 जून 2021 पर्यंतच्या कालावधीत रोजगार दिलेल्या नवीन कर्मचार्‍यांच्या संदर्भात भारत सरकार दोन वर्षांसाठी अनुदान देणार.


🔖1000 कर्मचार्‍यांच्या आस्थापनांमध्ये कामावर घेतलेल्या नवीन कर्मचार्‍यांच्या बाबतीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) यामध्ये 12 टक्के कर्मचार्‍यांचे योगदान आणि 12 टक्के नियोक्ता यांचे योगदान असे एकूण 24 टक्के योगदान भारत सरकार दोन वर्षांच्या कालावधीत देणार.


🔖1000 कर्मचार्‍यांपेक्षा अधिक संख्या असणाऱ्या आस्थापनांच्या बाबतीत भारत सरकार केवळ कर्मचार्‍यांचे 12 टक्के योगदानच देणार.


🔖15 हजार रुपयांपेक्षा कमी मासिक वेतन घेणारे कर्मचारी या योजनेचा लाभ घेवू शकतात.


🔖कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सदस्यांच्या आधार-जोडलेल्या खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने योगदान जमा करणार. तसेच संस्था या योजनेसाठी एक सॉफ्टवेअर विकसित करणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...