Wednesday 9 December 2020

नौदलाने दिली ‘स्मॅश 200 प्लस’ची ऑर्डर.


🔰भारतीय नौदलाला लवकरच इस्रायलकडून ‘स्मॅश 200 प्लस’ सिस्टिम मिळणार आहे. भारतीय नौदलाने या सिस्टिमसाठी ऑर्डर दिली आहे.

तर हे ड्रोन विरोधी शस्त्र आहे. या सिस्टिमद्वारे दिवसा तसेच रात्रीच्यावेळीही शत्रुंची छोटी ड्रोन्स पाडता येतील. ‘स्मॅश 200 प्लस’ ही एक कॉम्प्युटराइज्ड फायर कंट्रोल आणि इलेक्ट्रो-ऑप्टिक साइट सिस्टिम आहे.


🔰बदुक किंवा मशीन गनवर ‘स्मॅश 200 प्लस’ सिस्टिम बसवता येईल.पुढच्यावर्षीपासून ‘स्मॅश 200 प्लस’ सिस्टिमचा पुरवठा सुरु होईल.तसेच ‘स्मॅश 200 प्लस’ची किंमत 10 लाखापेक्षा कमी आहे. बंदुक किंवा मशीन गनवर ही सिस्टिम बसवून 120 मीटर अंतरावरुन वेगाने लक्ष्याच्या दिशेने येणारी छोटी ड्रोन्स हवेतच नष्ट करता  येईल.

भारत इस्रायलकडून ही सिस्टिम विकत घेणार  असला, तरी अशा पद्धतीचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे.


🔰भारत अमेरिकेसोबत मिळून छोटी एरियल सिस्टम ड्रोन स्वार्म (थव्याच्या स्वरुपात) तसेच ड्रोन्स विरोधी सिस्टिम विकसित करण्याचे काम सुरु करणार आहे. अमेरिकेबरोबर झालेल्या DTTI द्विपक्षीय करारातंर्गत ही सिस्टिम विकसित करण्यात  येईल.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...