Thursday 10 December 2020

Forbes ची जगातील सामर्थ्यवान महिलांची यादी जाहीर, निर्मला सीतारामन यांना ४१ वे स्थान.🏆 फोर्ब्सच्या जगातील सर्वात सामर्थ्यवान महिलांच्या यादीत जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल यांना पहिलं स्थान देण्यात आलं आहे. 


🏆 तसंच या यादीत कमला हॅरिस या तिसऱ्या तर निर्मला सीतारामन यांना ४१ वं स्थान देण्यात आलं आहे.


🏆 १७ व्या वार्षिक 'फोर्ब्स पॉवर लिस्ट'मध्ये ३० देशांतील महिलांचा समावेश करण्यात आला आहे.


🏆 "फोर्ब्सच्या या यादीत १० देशांतील प्रमुख महिला, ३८ मुख्य कार्यकारी अधिकारी, पाच मनोरंजन क्षेत्राशी निगडित महिलांचा समावेश आहे. जरी त्यांचं वय, नागरिकत्व आणि निरनिराळ्या क्षेत्रातील त्या असतील तरी त्यांनी २०२० मध्ये आवेव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला मिळालेल्या व्यासपीठाचा योग्यरित्या केला.


🏆 या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ४१ वं स्थान देण्यात आलं आहे. 


🏆 तर एचसीएलच्या रोशनी नाडार-मल्होत्रा यांना ५५ वं, 


🏆 किरण मजूमदार शॉ यांना ६८ वं स्थान देण्यात आलं आहे. 


🏆 तर लँडमार्क समूहाच्या प्रमुख रेणुका जगतीयानी यांना या यादीत ९८ वं स्थान देण्यात आलं आहे. 


🏆 जर्मनीच्या चान्सलर एन्जेला मार्केल या सलग दहाव्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहेत. एन्जेला मार्केल या युरोपमधील प्रमुख नेत्या आहेत.


🏆 जर्मनीला आर्थिक संकटातून बाहेर काढून त्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध करून जर्मनीत दहा लाख निर्वासितांना राहण्याची परवानगी देणाऱ्या मार्केल यांचं नेतृत्व खंबीर आहे. 


🏆 अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना या यादीत तिसरं स्थान देण्यात आलं आहे. 


🏆 तर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी करोना महासाथीदरम्यान देशात कडक लॉकडाउन लागू करून आपल्या देशाला मोठ्या संकटातून वाचवल्यामुळे त्यांना या यादीत दुसरं स्थान देण्यात आलं आहे.


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...