Tuesday, 22 December 2020

पश्चिम बंगालमधील पहिले तेल, वायू क्षेत्र देशाला समर्पित.



💭पश्चिम बंगालमधील 24 परगणा जिल्ह्य़ातील तेल व वायू क्षेत्र केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी देशाला समर्पित केले आहे. त्यामुळे तेल व वायू उत्पादन क्षेत्रात पश्चिम बंगालला प्रथमच स्थान मिळाले आहे.


💭तर कोलकात्यापासून 47 कि.मी अंतरावरील पेट्रोलियम साठय़ातून तेल निर्मिती सुरू करण्यात आली असून हे तेल हल्दीया येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडे शुध्दीकरणासाठी पाठवले जात आहे.


💭अशोकनगर तेल व वायू साठा क्षेत्रात प्रथमच तेल उत्पादन सुरू झाले असून हा तेल व वायू साठा 2018 मध्ये सापडला होता. अशोकनगर क्षेत्र हे महानदी-बंगाल-अंदमान खोऱ्यात असून ते व्यावसायिक पातळीवर योग्य आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 12 & 13 जानेवारी 2025

◆ 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.[स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस :- 12 जानेवारी] ◆ भारतीय हवामान विभाग (I...