Tuesday 22 December 2020

जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन: 18 डिसेंबर



💥भारताच्या पुढाकाराने दरवर्षी 18 डिसेंबर या दिवशी ‘जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन’ साजरा करतात. अल्पसंख्यांक समुदायांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करतात.


💥भाषिक, धर्म, जाती आणि वर्ण याबाबतीत अल्पसंख्यांक असलेल्या व्यक्तींच्या विशेषाधिकारांची उन्नती करणे आणि त्यांचे संरक्षण करणे, हे या दिवसाचे उद्दीष्ट आहे.

हा दिवस अल्पसंख्याकांशी निगडित मुद्द्यांविषयी आणि त्यांच्या सुरक्षिततेबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि लोकांना शिक्षित करण्यावर केंद्रित असतो.


💥भारतीय संविधान सर्व नागरिकांना समान हक्क प्रदान करते आणि त्यात भाषिक, वांशिक, सांस्कृतिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी अनेक उपायांचा अवलंब करण्यात आला आहे.


💢पार्श्वभूमी


💥जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन हा भारत सरकारच्या राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या पुढाकाराने साजरा केला जातो.


💥सयुक्त राष्ट्रसंघाने 18 डिसेंबर 1992 रोजी धार्मिक किंवा भाषिक राष्ट्रीय किंवा वांशिक अल्पसंख्याकांच्या व्यक्तींच्या हक्कांविषयक जागतिक करारनामा स्वीकारला होता. अल्पसंख्याकांच्या परिस्थितीत सुधारणा करणे आणि राष्ट्रीय, भाषिक, धार्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेविषयी जनजागृती करणे ही राज्य सरकारचीही जबाबदारी असल्याचेही त्यात नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

....𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....

◾️2024 विस्डेन क्रिकेटर्स ऑफ द इयर रिपोर्ट प्रकाशित ◾️रिपोर्ट नुसार जगातील सर्वाधिक आघाडीचे क्रिकेटपटू ⭐️पुरुष : पॅट कमिन्स (Australia) ...