Tuesday 22 December 2020

देशात बिबटय़ांच्या संख्येत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर


भारतात वाघांसोबतच बिबटय़ांची देखील गणना केली जात असून बिबटय़ांच्या संख्येत महाराष्ट्र तिसऱ्या क्र मांकावर आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया २०१८’ हा अहवाल सोमवारी प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, महाराष्ट्रात एक हजार ६९० बिबटे आहेत.


राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी हा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार, २०१४च्या तुलनेत २०१८ साली देशात बिबटय़ांची संख्या ६० टक्क्यांनी वाढली आहे. २०१४ मध्ये आठ हजार बिबटे होते. २०१८ मध्ये ही संख्या १२ हजार ८५२ इतकी झाली. 


संरक्षित वनक्षेत्रात बिबटय़ांची गणना करण्यात आली आहे. मात्र, बिबटे हा गावाच्या सीमेलगत राहणारा प्राणी असल्यामुळे त्यांची एकू ण संख्या यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता वन्यजीव तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. संरक्षित क्षेत्राशिवाय शेतशिवारात बिबटय़ांचा वावर मोठय़ा प्रमाणात आहे. वाघांचा अधिवास असणाऱ्या संरक्षित वनक्षेत्रात आणि काही ठिकाणी शेतजमिनीवरही ही गणना करण्यात आली. 


महाराष्ट्र बिबटय़ांच्या संख्येत तिसऱ्या क्र मांकावर असला तरीही गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी बिबटय़ांचे मृत्यू अधिक आहेत. यावर्षी सुमारे १७५ बिबटय़ांचा मृत्यू झाला आहे. 


बिबटय़ांच्या माणसांवरील हल्ल्यात देखील वाढ झाली आहे. बिबटय़ांच्या संदर्भात कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. बिबटय़ांच्या मृत्यूत वाढ झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.


बिबटय़ांची संख्या


मध्यप्रदेश : ३, ४२१

कर्नाटक : १, ७८३

कर्नाटक, तामिळनाडू,

गोवा, केरळ : ३, ३८७

उत्तरप्रदेश, उत्तराखंड, बिहार : १, २५३

No comments:

Post a Comment

Latest post

भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना

👉 1. महंमद गझनवी :- अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्‍या...