Tuesday 22 December 2020

DRDO ने विकसित केली जगातील सर्वोत्तम हॉवित्झर तोफ


🅾️सवदेशी बनावटीची ATAGS हॉवित्झर ही जगातील सर्वोत्तम तोफ आहे.

तर दूरवरच्या 48 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर प्रहार करण्याची या तोफेची क्षमता आहे असे संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजे DRDO च्या वैज्ञानिकाने सांगितले.


🅾️सवदेशी बनावटीची ही तोफ भारतीय लष्कराच्या सर्व गरजा पूर्ण करु शकते. या क्षेत्रात आयातीची आवश्यकता नाही असे ATAGS हॉवित्झर तोफ  प्रकल्पाचे संचालक आणि डीआरडीओचे वरिष्ठ वैज्ञानिक शैलेंद्र व्ही गाडे फिल्ड चाचणी दरम्यान एएनआयशी बोलताना म्हणाले.


🅾️चीन सीमेजवळ सिक्कीम आणि पाकिस्तान सीमेजवळ पोखरण येथे चाचणी दरम्यान ATAGS हॉवित्झरमधून दोन हजार राऊंडस फायर करण्यात आल्या आहेत असे गाडे यांनी सांगितले.

भारतीय लष्करात वापरात असलेली बोफोर्स आणि इस्रायलने जी ATHOS तोफ देण्याची तयारी दाखवलीय, त्यापेक्षा स्वदेशी ATAGS हॉवित्झरमधील सिस्टिम अधिक चांगली आहे असे गाडे म्हणाले.


🅾️तसेच कारगिल युद्धात पाकिस्तानवरील विजयात बोफोर्स तोफांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ATAGS हॉवित्झर डीआरडीओने विकसित केली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...