Monday 11 January 2021

मित्रांनो नमस्कार आयोगाचं वेळापत्रक आज जाहीर झालं मग, आपण आज काय करताय ?



आता गरज आहे योग्य नियोजनाची, योग्य अभ्यासाची सकारात्मक दृष्टिकोन ठेवून यशाकडे वाटचाल करण्याची.. कोरोनात काय कमावलं ? काय गमावलं ? याचा हिशोब न करता...! आता काही मिळवायचं आहे यासाठी, तुम्हाला आता उतरावं लागेल या तिमिर मैदानात आपल्या आयुष्याच्या विजयाचा रणशिंग फुंकण्यासाठी...!  सोडून द्यावे लागेल सगळे हेवेदावे, वाद  विवाद आणि करावा लागेल संघर्ष आपल्या डोळ्यात आपण पाहिलेल्या स्वप्नांना सत्य रूप देण्यासाठी...  त्यासाठी सोडावी लागेल असत्याची कास..! सोडावा लागेल असत्य मार्ग..! सोडावा लागेल त्या प्रत्येक माणसांची साथ जे नकारात्मक आहे..! आणि धरावा लागेल सत्य स्वप्नांचा सहवास ..! 


सत्य आणि वास्तव दाखवणाऱ्या पुस्तकांचा सहवास...! मित्र परिवार, जिवलग, यारी, दोस्ती, प्रेम, जिगर, काळीज यांना बाहेर काढून ठेवा..!  आणि काळजात फक्त स्वप्न आणि आयोगाचा वेळापत्रक पेरा, कारण ते तुम्हाला तुमच्या आयुष्याला एक सकारात्मकता देणार क्षेत्र आता असणार आहे.. ती एक परीक्षा जी तुमच्यासाठी सर्वात मोठी लढाई आता असणार आहे..!  म्हणून मला वाटतं की, काही काळ सोशल मीडिया बंद करा..!  व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम सगळं सगळं बंद करा कारण हे सगळं आभासी जग आहे..!  थोडा थोडा काळ मनाला सुख, शांती, समाधान देत पण, यातून मिळणारी कुठली गोष्ट शाश्वत कधीच नसते शाश्वत असतं तेच जे आपण आपल्या कष्टाने मिळवलेले प्रत्येक यश शाश्वत असत.  आपण आपल्या विजयानं आपल्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर खुललेलं समाधानाचं हास्य हेच एकमेव जगातील सर्वात मोठे शाश्वत गोष्ट आहे. ती शाश्वत गोष्ट मिळवण्यासाठी आता उतरावं लागेल या आयोगाच्या परीक्षेच्या मैदानात त्यासाठी तुम्हाला लढण्यासाठी सज्ज व्हावं लागेल. छोट्या छोट्या चुका काढून मोठी मोठी डोंगरांना वळसा घालून तुम्हाला यशाच्या गावापर्यंत जावंच लागणार आहे..!


म्हणून आता एकच यशाचा नियम आयुष्य आणि अभ्यास यांच्याशी प्रामाणिक राहून परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण व्हायची आणि जिंकायची लढाई आपल्या अस्तित्वाची... तुम्ही मुलगा असाल, तुम्ही मुलगी असाल हा न्यूनगंड बाजूला फेकून द्यायचा..!  आणि एक विद्यार्थी, एक भावी अधिकारी, एक कुटुंबातील जबाबदारी व्यक्ती, भारतातील सुजाण, सज्ञान नागरिक म्हणून या परीक्षेला सामोरे जा..! आणि दाखवा तुमचे यश या संपूर्ण जगाला... दाखवा तुमचे यश, ज्यांनी-ज्यांनी वेळोवेळी तुम्हाला निगेटिव्ह केले त्यांना...! दाखवा तुमचे यश आणि वेळोवेळी तुम्हाला दुखावले त्यांना ..! त्यांनी तुमचा अपमान केलाय त्यांचा बदला घेण्याची प्रामाणिक वेळ आली आहे म्हणून प्रामाणिकपणे यांचा बदला घ्यायचा परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन..!  आता सिद्ध होण्यासाठी, वास्तव दाखवण्यासाठी तुमच्यासमोर सर्वात मोठी संधी आता आलेली आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी... आता तुम्हाला उतरावं लागेल प्रामाणिकपणे संघर्ष करण्यासाठी...


No comments:

Post a Comment

Latest post

Important Lakes in India

🔹डल झील :- जम्मू-कश्मीर 🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर 🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर 🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर 🔹नागिन झील :- जम्मू-कश...