Monday 11 January 2021

नासाच्या अवकाशयानाचे ‘बेन्नू’ लघुग्रहावर यशस्वी अवतरण


🔥नासाच्या ‘ऑसिरिस रेक्स’ अवकाशयानाने बेन्नू या लघुग्रहावर मंगळवारी यशस्वी अवतरण केले असून यांत्रिक बाहूच्या मदतीने त्याच्यावरील खडकाचे नमुने घेतले आहेत. हे खडक सौरमालेच्या जन्मावेळचे आहेत. ते आता पृथ्वीवर आणले जातील असे नासाने म्हटले आहे.


🔥दी ओरिजिन्स, स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन रिसोर्स आयडेंटीफिकेशन, सिक्युरिटी रिगोलिथ एक्सप्लोरर (ओसिरिस-रेक्स ) अवकाशयान पृथ्वीनिकटच्या या लघुग्रहावर अलगद उतरले. तेथील खडकाचे तुकडे व धूळ गोळा केली. आता ते नमुने २०२३ पर्यंत पृथ्वीवर परत आणण्यात येणार आहेत. बेन्नू हा लघुग्रह पृथ्वीपासून ३२१ दशलक्ष किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर आहे. या लघुग्रहाच्या अभ्यासातून सौरमालेच्या निर्मितीवेळच्या परिस्थितीचा अंदाज घेता येईल.


🔥अब्जावधी वर्षांपूर्वी सूर्यमालेची निर्मिती झाली होती. त्यावेळी विखुरलेल्या घटकातून पृथ्वीवर जीवसृष्टीची बिजे रोवली गेली असावी असे नासाचे म्हणणे आहे. मंगळवारी यानाच्या यांत्रिक बाहूने ‘टच अँड गो’ म्हणजे ‘टॅग’ उपक्रमात या लघुग्रहावरील खडक, माती गोळा केली असून आता हे यान मार्च २०२१ मध्ये पृथ्वीकडे परतीचा प्रवास सुरू करणार आहे. कदाचित जानेवारीत लघुग्रहावर यान उतरवण्याचा दुसरा प्रयत्न केला जाऊ शकतो.

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ युनायटेड नेशन्स ट्रेड अँड डेव्हलपमेंट (UNCTAD ) च्या अहवालानुसार  2023 मध्ये भारतात थेट परकीय गुंतवणुकीत 15 व्या स्थानावर आहे ◾️2023 मध...