Monday 11 January 2021

सतर्कता व भ्रष्टाचार निर्मूलन’ विषयी राष्ट्रीय परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 ऑक्टोबर 2020 रोजी ‘सतर्कता (दक्षता) व भ्रष्टाचार निर्मूलन’ विषयी एका राष्ट्रीय परीषदेचे आभासी पध्दतीने उद्घाटन करणार आहेत.


 "सतर्क भारत, समृध्द भारत" (Vigilant India, Prosperous India) या या कार्यक्रमाचा विषय असणार आहे.


📌 ठळक बाबी :


 केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) दरवर्षी 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत ‘सतर्कता जागृती सप्ताह’ साजरा करीत असतो आणि ही परिषद  याच सप्ताहात आयोजित केली जात आहे.


 परिषदेत सतर्कता या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यायोगे लोकांमध्ये जनजागृती करणे आणि नागरिकांना सहभागी करीत भारताच्या सार्वजनिक जीवनातली अस्मिता आणि सत्यनिष्ठा या संकल्पनांचे सबळीकरण हा या परीषदेचा हेतू आहे.


 या तीन दिवस चालणाऱ्या परिषदेत परदेशी कायद्यांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या कक्षांमुळे तपास करण्यात येणारी आव्हाने, भ्रष्टाचार विरोधात कार्यरत नियंत्रणासाठी सतर्कता प्रक्रिया, आर्थिक घोटाळे समाविष्ट असणाऱ्या कार्यप्रणालीतल्या सुधारणा आणि बँकांमधल्या फसवणूकींना प्रतिबंध, लेखा परीक्षण प्रभावीपणे करुन त्याने विकास घडवून आणणे, भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यात नव्या सुधारणा करत भ्रष्टाचार विरोधात लढणे, क्षमता विस्तार आणि प्रशिक्षण, त्वरित आणि प्रभावीपणे तपास करण्याकरता बहुआयामी समन्वय, आर्थिक अपराध करणाची प्रवृत्ती, सायबर गुन्हे आणि आंतरराष्ट्रीय संघटीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या उत्तम कार्यपध्दतींचे एकमेकांत आदानप्रदान या सारख्या विषयांवर चर्चा होणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

G7 बद्दल माहिती

🔖सौदीने तेल 300% महाग केले होते आणि 1973 मध्ये G7 ची स्थापना हालचाल सुरू झाली 📌 इस्रायल आणि अरब राष्ट्रांमध्ये युद्ध झाले. दरम्यान, अमेरि...