Thursday 18 February 2021

नव्या विषाणूवर परिणामाअभावी कोव्हिशिल्ड लशीची परतपाठवणी.



🔰दक्षिण आफ्रिकेतील नवकरोनावर निष्प्रभ ठरत असलेल्या कोव्हिशिल्ड लशीचे १० लाख डोस परत घ्यावेत, असे त्या देशाने पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या कंपनीला कळवले आहे. फेब्रुवारीत लशीचे हे डोस पाठवण्यात आले होते. दरम्यान,आज मंगळवारी  जागतिक आरोग्य संघटनेने या लशीच्या आपत्कालीन वापरास जगातील देशांना परवानगी दिली आहे.


🔰दक्षिण आफ्रिकेतील नवकरोनावर कोविशिल्ड ही अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी तयार केलेली लस प्रभावी नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील या लशीच्या माध्यमातून केले जाणारे लसीकरण थांबवण्यात आले होते.


🔰दरम्यान, नवकरोनासाठी सध्याच्या लशीत काही बदल करण्याचे प्रयत्न अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ करीत आहे. या लशीची निर्मिती सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने भारतात कोविशिल्ड म्हणून केली होती. या लशीचे १० लाख डोस दक्षिण आफ्रिकेला गेल्या आठवडय़ाच पाठवले होते. पुढील काही आठवडय़ात पाच लाख डोस येणे अपेक्षित होते. पण त्याआधीच दक्षिण आफ्रिकेने ही लस नाकारली आहे. कंपनीने यावर रॉयटर्स वृत्तसंस्थेला कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...