Thursday, 18 February 2021

शहरी सहकारी बँकांना बळकटी देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) विश्वनाथन समिती नेमली



🔰भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शहरी सहकारी बँकांना बळकटी देण्याच्या हेतूने दृष्टिकोण पत्र (अ‍ॅप्रोच लेटर) तयार करण्यासाठी आठ सदस्यांचा समावेश असलेली एक समिती नेमलेली आहे. समितीला तीन महिन्यांत आपला अहवाल रिझर्व्ह बँकेकडे सादर करावा लागणार आहे.


🅾️ठळक बाबी


🔰RBIचे माजी डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत.

दृष्टिकोण पत्र सर्व ठेवीदारांच्या हितासाठी आणि सहकार्यासह यंत्रणेशी संबंधित मुद्दे लक्षात घेऊन तयार केले जाईल.


🔰समिती शहरी सहकारी बँकांच्या प्रश्नावर उपाययोजना सुचवेल. ही समिती विद्यमान नियामक व देखरेख प्रणालीचा आढावा घेईल आणि या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सूचना देईल.


🅾️सहकारी बँका (को-ऑपरेटिव्ह बँक)


🔰जया बँका सहकाराच्या तत्वांनुसार संघटित केल्या जातात, त्यांना ‘सहकारी बँका’ असे म्हणतात, सर्वांनी एकत्र येऊन एकदिलाने आणि एकविचाराने समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कसून प्रयत्न करणे, हे सहकाराचे तत्व होय. सहकारी बँकेच्या सदस्यांच्या अडचणींची सोडवणूक करणे, त्यांना मदत करणे आणि अशा पद्धतीने सर्व सदस्यांचे हित साधणे, ही सहकारी बँकेची प्रमुख उद्दिष्ये असतात. नफा मिळविणे हे उद्दिष्ट असले, तरी ते दुय्यम महत्त्वाचे असते. सहकारी बँका प्रामुख्याने ग्रामीण भागांत कार्य करतात. शेतीसाठी अल्प मुदतीचा कर्जपुरवठा त्या कार्यक्षमतेने करू शकतात त्याचप्रमाणे ग्रामीण भागांतील स्थानिक व्यापार आणि छोटे उद्योगधंदे यांनाही कर्जपुरवठा करतात. नागरी भागात नागरी सहकारी बँका व्यापारी आणि छोटे कारखानदार यांना अल्प मुदतीचा कर्जपुरवठा करतात. मोठे कारखाने, सरकारी कचेऱ्या वगैरे ठिकाणी कामगारांच्या सहकारी पतसंस्था असतात व त्या आपल्या सदस्यांना आर्थिक अडचणींवर मात करण्यास मदत करतात.

No comments:

Post a Comment

Latest post

राज्यसेवा पूर्व झाली.. आता combine गट ब ची तयारी !!

दि. 5 जानेवारी 2024 ला आपण आतुरतेने वाट पाहणाऱ्या combine गट ब ची पूर्व परीक्षा होत आहे.. या निमित्ताने विद्यार्थी म्हणून आपली भूमिका कशा पद...