Saturday 11 September 2021

ऐतिहासिक “कार्बी आंगलाँग” करारावर स्वाक्षऱ्या..🔰आसामच्या प्रादेशिक अखंडतेची सुनिश्चिती करून या भागात अनेक दशके रेंगाळत राहिलेली समस्या संपविण्याच्या हेतूने ऐतिहासिक “कार्बी आंगलाँग” करारावर 4 सप्टेंबर 2021 रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या झाल्या.


🔰या ऐतिहासिक करारामुळे 1,000 हून अधिक सशस्त्र कार्यकर्ते हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले गेले. कार्बी भागाचा विकास करण्याच्या उद्देशाने विशिष्ट प्रकल्प हाती घेण्यासाठी केंद्रीय सरकार तसेच आसाम राज्य सरकार येत्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये वापरण्यासाठी 1,000 कोटी रुपयांचे विशेष विकास पॅकेज देणार आहे.


🔰कार्बी करार हा “बंडखोरी मुक्त समृध्द ईशान्य प्रदेश” निर्माण करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.


🔴कराराची ठळक वैशिष्ट्ये..


🔰हा सामंजस्य करार कार्बी आंगलाँग स्वायत्त मंडळाला अधिक स्वायत्तता मिळेल तसेच कार्बी जनतेची विशिष्ट ओळख, भाषा, संस्कृती, इत्यादींचे संरक्षण होईल याची हमी देईल आणि आसामच्या प्रादेशिक तसेच प्रशासकीय अखंडतेला धक्का न लावता मंडळाच्या कार्यकक्षेतील प्रदेशाचा विकास साधण्यावर लक्ष केंद्रित करेल.


🔰हिंसेचा मार्ग सोडून या भागात कायद्याने प्रस्थापित केलेल्या शांततापूर्ण लोकशाही प्रक्रियेत सामील होण्यास सशस्त्र कार्बी गटांनी सहमती व्यक्त केली आहे. सशस्त्र गटाच्या कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्याची सुविधा देखील या करारान्वये देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पोलीस भरतीसाठी महत्वाचे 50 प्रश्न उत्तरे

1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ◾️  नाईल (4,132 मैल) 2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? ◾️ आशिया 3) जगातील सर्वात मोठा देश कोणता...