Saturday 11 September 2021

मानवरहित हवाई प्रक्षेपण यान प्रकल्पासंबंधी भारत आणि अमेरिका यांच्यात करार..


🔰भारताचे संरक्षण मंत्रालय आणि संयुक्त राज्ये अमेरिका या देशाचे संरक्षण विभाग यांच्या दरम्यान 30 जुलै 2021 रोजी ‘संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकार’ (DTTI) यामधील संयुक्त कृतीगट हवाई प्रणाली अंतर्गत प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या मानवरहित यान (ALUAV) यांच्या निर्मितीसाठी आखलेल्या प्रकल्पासंबंधीचा करार झाला.


🔰हा करार संशोधन, विकास, चाचणी आणि मूल्यमापन अंतर्गत येत असून ते संरक्षण उपकरणाच्या सह-विकासाद्वारे दोनही देशांदरम्यान तंत्रज्ञान सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरते आहे.


🔴‘संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकार’ (DTTI) विषयी...


🔰‘संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकार’ (DTTI) याचे मुख्य उद्दिष्ट सहकार्यात्मक तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतीय आणि अमेरिकेच्या सैन्य दलांसाठी भविष्यातील तंत्रज्ञानाचे सह-उत्पादन आणि सह-विकासासाठी संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करणे हा आहे.


🔰DTTI अंतर्गत, संबंधित शाखांमधील परस्पर सहमतीच्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी लष्कर, नौदल, हवाई आणि विमानवाहू तंत्रज्ञानावरील संयुक्त कृतीगट स्थापन करण्यात आले आहेत. मानव रहित हवाई प्रक्षेपण यानाच्या संयुक्त विकासावरील करारावर हवाई प्रणालीवरील संयुक्त कृतीगटाकडून देखरेख ठेवली जात आहे.


🔰मानवरहित हवाई प्रक्षेपण यानाच्या प्रारूपाच्या संयुक्त विकासासाठी प्रणालींची रचना, विकास, प्रात्यक्षिक, चाचणी आणि मूल्यमापन करण्यासाठी प्रकल्प करारात हवाई दल संशोधन प्रयोगशाळा, भारतीय हवाई दल आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) यांच्यातील सहकार्याची रूपरेषा आखण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...