Saturday 11 September 2021

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021🔰सवच्छ भारत अभियान (टप्पा-2) अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण, 2021” या उपक्रमाचा 9 सप्टेंबर 2021 रोजी प्रारंभ करण्यात येणार आहे. 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' चा एक भाग म्हणून, देशभरातील हागणदारी मुक्त उपक्रम आणि परिणामांना स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण उपक्रमाने समर्थन देण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे.


🔰सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून, गावे, जिल्हे आणि राज्ये यांना प्रमुख मापदंडांच्या आधारे क्रमवारीत स्थान दिले जाईल.


🔰सवच्छ सर्वेक्षण ग्रामीण उपक्रमाचा भाग म्हणून, देशभरातील 698 जिल्ह्यांमधील 17,475 गावांचा समावेश केला जाईल. या गावांमधील शाळा, अंगणवाड्या, सार्वजनिक आरोग्य केंद्रे, हाट/बाजार/धार्मिक स्थळे या 87,250 सार्वजनिक स्थळांना सर्वेक्षणासाठी भेट देण्यात येईल. सुमारे 1,74,750 कुटुंबांची स्वच्छ भारत अभियान संबंधित समस्यांवरील प्रतिसादासाठी मुलाखत घेतली जाईल. तसेच, यासाठी विकसित अॅप्लिकेशनचा वापर करून स्वच्छताविषयक समस्यांवर ऑनलाईन अभिप्राय देण्यासाठी नागरिकांना एकत्र आणले जाईल.


🔰सवच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 उपक्रमाच्या विविध घटकांचे मूल्यांकन खालीलप्रमाणे आहे:


🔰सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे थेट निरीक्षण – 30 टक्के

सामान्य नागरिक, ग्रामीण स्तरावरील प्रमुख प्रभावी व्यक्ती आणि मोबाईल अॅपद्वारे नागरिकांकडून ऑनलाइन अभिप्रायासह नागरिकांच्या प्रतिक्रिया – 35 टक्के

स्वच्छता संबंधित मापदंडांवर सेवा स्तरावरील प्रगती – 35 टक्के


🔴पार्श्वभूमी..


🔰पयजल आणि स्वच्छता विभागाने "स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण (SSG) 2018 आणि 2019 या उपक्रमांचे आयोजन केले होते. प्रमुख गुणवत्ता आणि संख्यात्मक मापदंडांसंबंधित त्यांच्या कामगिरीच्या आधारे जिल्ह्यांच्या क्रमवारीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी एक सविस्तर शिष्टाचार / प्रोटोकॉल विकसित करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पोलीस भरतीसाठी महत्वाचे 50 प्रश्न उत्तरे

1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ◾️  नाईल (4,132 मैल) 2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? ◾️ आशिया 3) जगातील सर्वात मोठा देश कोणता...