Monday 20 December 2021

नाना जगन्नाथ शंकर सेठ (१८०३-१८६५)


✍️नाना शंकर सेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी झाला. त्यांचे मुळ गाव "मुरबाड" हे होते.


✍️१८२२ मध्ये "बाँम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी" या संस्थेची स्थापना त्यांनी केली. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एका भारतीय मानसाने स्थापन केलेली ही पहीली संस्था होती. 

✍️या संस्थेच्या माध्यमातुन १८४८ मध्ये नाना शंकर सेठ यांनी मुंबई येथे मुलींची पहीली शाळा सुरु केली. (देशातील पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरु केली)


✍️१८४५ मध्ये नाना शंकरसेठ यांनी मुंबई येथे ग्रँड मेडीकल कॉलेज" ची स्थापना केली. याच कॉलेजमधुन १८६१ पासुन वैद्यकिय शिक्षण मराठी भाषेतून देण्याची व्यवस्था केली.


✍️ 1845 मध्ये शंकरसेठ यांनी स्टुडंट लिटररी ॲन्ड सायंटीफिक सोसायटी ची स्थापना मुंबई येथे केली. 

✍️ १८५० ते १८५६ या कालावधीत मुंबई प्रांताच्या "बोर्ड ऑफ एज्युकेशन" चे ते सदस्य होते.


✍️ नाना शंकरसेठ यांनी मुंबई विद्यापीठाचे "फेलो" म्हणुन काम केले आहे. तसेच ते ब्रिटीश काळामध्ये भारतीय रेल्वेच्या संचालक मंडळावर सदस्य होते.


✍️  बरिटीशांनी नाना शंकरसेठ यांच्या कामावर खुष होवुन त्यांना "जस्टीस ऑफ पिस" पदवी दिली. (जस्टीस ऑफ पिस म्हणजे जनतेस न्याय मिळावा म्हणुन राजाने नेमलेला प्रतिनिधी) 

✍️नाना जगन्नाथ शंकरसेठ यांनी "एल्फिस्टन हायस्कुल व कॉलेजची" स्थापना केली. 

तसेच आजचे मुंबईतील

जे. जे. हॉस्पीटल उभारण्यासाठी नाना जगन्नाथ शंकरसेठ यांनी मोठ्याप्रमाणात प्रयत्न केले होते.


✍️२६ ऑगस्ट १८५२ रोजी "बॉम्बे असोशिएशन" ही भारतातील पहीली राजकिय संघटना स्थापन केली.


✍️१८५७ मध्ये शंकरसेठ यांनी "दि जगन्नाथ शंकरसेठ फस्ट ग्रेड अँग्लो हायस्कुल" स्थापन केले. तसेच नाना जगन्नाथ शंकरसेठ हे मुंबई इलाक्याच्या कायदे मंडळाचे पहीले सदस्य होते.


✍️ नाना जगन्नाथ शंकरसेठ यांचा मृत्यु ३१ जुलै १८६५ रोजी झाला.


✍️ मबईचा पहिला गव्हर्नर "एल्फिस्टन" हा होता. नाना जगन्नाथ शंकरसेठ यांचे मुंबई गव्हर्नर सोबत असलेल्या संबंधामुळेच त्यांनी गर्व्हनर एल्फिस्टन यांच्या नावाने कॉलेज काढले होते.

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...