Saturday 11 December 2021

ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढल्याने ब्रिटनमध्ये कठोर उपाययोजना जाहीर


🔰ब्रिटनमध्ये करोनाच्या ओमायक्रॉन या नव्या उपप्रकाराचे आणखी १३१ रुग्ण आढळल्याने रुग्णांची एकूण संख्या ५६८ झाली आहे. या पार्श्वभूमीवर; शक्य असेल तेथे घरून काम करणे, मुखपट्टीबाबतचे विस्तारित नियम, तसेच कुठल्याही ठिकाणी जाण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्राचा वापर यांसारख्या अधिक कठोर उपाययोजना पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी बुधवारी जाहीर केल्या.


🔰दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या ओमायक्रॉन या अत्यंत संसर्गजन्य उपप्रकाराचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने ब्रिटन सरकारचे तथाकथित ‘प्लॅन बी’ हिवाळी धोरण या शुक्रवारपासून टप्प्या-टप्प्याने अमलात येणार आहे. हा उपप्रकार दोन ते तीन दिवसांत दुप्पट वेगाने वाढतो, असे जॉन्सन यांचे म्हणणे आहे.


🔰करोनाच्या यापूर्वी प्रबळ असलेल्या डेल्टा या उपप्रकारापेक्षा ओमायक्रॉनचा अधिक वेगाने प्रसार होतो, असे जॉन्सन यांनी डाउनिंग स्ट्रीट येथील पत्रकार परिषदेत सांगितले.


🔰‘नाट्यगृहे व चित्रपटगृहे यांसह सार्वजनिक अंतगृह स्थळी मुखपट्टी वापरण्यासारख्या कायदेशीर तरतुदी आम्ही शुक्रवारपासून लागू करू. घरून काम करण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे आम्ही पुन्हा लागू करू. सोमवारपासून तुम्हाला शक्य असेल तर घरून काम करा आणि आवश्यक असेल तर कामावर जा, पण शक्यतो घरूनच काम करा’, असे आवाहन जॉन्सन यांनी केले.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...