Saturday 11 December 2021

सामान्य विज्ञान : सराव परीक्षा

प्र.१. वटवाघूळ उडत असताना _ ध्वनी निर्माण करतात.
A) लघु वारंवारतेचा
B) उच्च वारंवारतेचा ✅
C) मध्यम वारंवारतेचा
D) यापैकी नाही

प्र.२. कोणते पाणी सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते?
A) विहिरीतील
B) नळाचे
C) तलावाचे
D) पावसाचे ✅

प्र.३. कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्राज्ञाने लावला?
A) डॉ. हॅन्सन ✅
B) डॉ. रोनॉल्ड
C) डॉ. बेरी
D) डॉ. निकेल्सनू

प्र.४. ७ कि.मी. = डेकामीटर ?
A) ७०
B) ७०० ✅
C) ७०००
D) ०.७००

प्र.५. खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात?
A) स्ट्रेप्टोमायसिन ✅
B) पेनिसिलिन
C) डेप्सॉन
D) ग्लोबुलिन

प्र.६. कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो?
A) कावीळ
B) विषमज्वर
C) अतिसार
D) वरील सर्व ✅

प्र.७. देवी या रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढली?
A) एडवर्ड जेन्नर ✅
B) लुई पाश्चर
C) श्याम विल्मुट
D) कार्ल स्टिनर

प्र.८. विद्यूत शक्ती _ मध्ये मोजतात.
A) वॉल्ट
B) केल्वीन
C) वॅट ✅
D) कॅलरी

प्र.९. ढगांचा गडगडात वीज चमकल्यानंतर थोड्यावेळाने ऐकू येतो; कारण
A) ढग आकाशात खूप उंचावर असतात
B) प्रकाश व आवाजाची गती समान असते
C) प्रकाशाची गती ध्वनीच्या गतीपेक्षा जास्त असते ✅
D) ध्वनीची गती प्रकाशाच्या गती पेक्षा जास्त आहे

प्र.१०. तुमच्या शरीराची स्थितिज ऊर्जा कमीत कमी असते, जेव्हा तुम्ही
A) खुर्चीवर बसलेले असता
B) जमिनीवर बसलेले असता
C) जमिनीवर झोपलेले असता ✅
D) जमिनीवर उभे असता

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...