परमहंस मंडळी

🔰 स्थापना - 31 जुलै 1849
🔰 ठिकाण - मुंबई
🔰 संस्थापक - दादोबा पांडुरंग तर्खडकर
🔰 अध्यक्ष - राम बाळकृष्ण(पाहिले आणि शेवटचे)
🔰 इतर सदस्य - भाऊ महाजन,आत्माराम पांडुरंग,

🔰उद्देश - ते एका देवावर विश्वास ठेवत (एकेश्वरवादाचा पुरस्कार)आणि रोटीबंदीचे बंधन तोडणे व जातीभेद मोडणे मुख्य उद्देश

🔰 इतर मुद्दे -
🔸ब्राम्हो समाज व त्यांच्या विचारांचा प्रभाव
🔸स्त्रियांसाठी शिक्षण, विधवा पुनर्विवाह यावरही त्यांचा विश्वास होता
🔸धर्मविवेचन,पारमहंसिक ही परमहंस सभेचे विचार सांगणारी दोन पुस्तके दादोबा पांडुरंग यांनी तयार केली
🔸सभेचे कार्य गुप्त पद्धतीने चाले
🔸सभेचे जनमानसात ओळख झाल्यावर समोर येणार होते,परंतु त्यांच्या सभासदांची यादी कुणी पळविल्यामुळे सभेची मंडळी घाबरली व सभेचे 1860 ला अस्तित्व संपले

🔰 ते दादोबाच्या सात तत्त्वांवर आधारित होते

१. केवळ देवाचीच पूजा केली पाहिजे
२. खरा धर्म हा प्रेम आणि नैतिक आचरणावर आधारित आहे
३. अध्यात्मिक धर्म एक आहे
४. प्रत्येक व्यक्तीला विचारस्वातंत्र्य असायला हवे
५. आपली कृती आणि बोलणे योग्य असावे
६. माणूस ही एक जात आहे
७. योग्य प्रकारचे ज्ञान सर्वांना द्यायला हवे

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...