Thursday 3 March 2022

जगातील सर्वात मोठं कार्गो विमान रशियाच्या हवाई हल्ल्यात जळून खाक; युक्रेन म्हणालं, “विमान नष्ट झालं तरी…”.

✈️रशिया युक्रेनवर करत असलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये जगातील सर्वात मोठं कार्गो विमान नष्ट झालं नाही. युक्रेनमध्ये तयार करण्यात आलेलं अंटोंनोव्ह-२२५ मिर्या असं या जगातील सर्वात मोठ्या कार्गो विमानाचं नाव होतं. हे विमान किव्हजवळच्या होस्तोमील विमानतळावर करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये नष्ट झालंय. युक्रेनमधील सरकारी हत्या निर्मिती कंपनी असणाऱ्या युक्रोबोरोनप्रोम या कंपनीने रविवारी यासंदर्भातील माहिती दिलीय.

✈️“रशियन हल्लेखोरांनी युक्रेन हवाई क्षेत्रातील महत्वाचं आणि विशेष असं एएन-२२५ मिर्या विमान नष्ट केलंय. किव्हजवळच्या होस्टोमील एअरफिल्डवर हा सारा प्रकार घडलाय,” असं कंपनीने म्हटलंय. इतकच नाही तर विमान नष्ट झालं असलं तरी पुन्हा आम्ही ते निर्माण करु असा विश्वासही कंपनीने व्यक्त केलाय. “आम्ही पुन्हा या विमानाची बांधणी करु. आम्ही आमचं सशक्त, मुक्त आणि स्वतंत्र युक्रेनचं स्वप्न पूर्ण करु,” असंही कंपनीने म्हटलं आहे.

✈️या विमानाच्या दुरुस्तीसाठी तीन बिलियन अमेरिकन डॉलर्स खर्च होईल असा अंदाज आहे. तसेच हे विमान दुरुस्त करण्यासाठी बराच वेळही लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...