Sunday 16 October 2022

लक्षात ठेवा

           

२१ मार्च व २३ सप्टेंबर या दोन दिवशी संपातस्थिती निर्माण होते. म्हणून या दोन दिवसांना ..... असे म्हणतात.
- संपातदिन

ज्या वेळी पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो तेव्हा त्या स्थितीस .... असे म्हणतात.
- अयनस्थिती

२१ मार्च या संपातदिनाला उत्तर गोलार्धात ..... म्हणून ओळखले जाते.
- वसंत संपात

२३ सप्टेंबर या संपातदिनाला उत्तर गोलार्धात .... म्हणून ओळखले जाते.
- शरद संपात

पृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यास किती वेळ लागतो ?
- चार मिनिटे

पृथ्वीवरील दोन स्थानांमधील रेखावृत्तीय अंशात्मक अंतरास .... मिनिटांनी गुणले असता त्या दोन ठिकाणातील स्थानिक वेळेतील फरक समजू शकतो.
- चार

विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस २३°३०' अक्षवृत्ता पर्यंतच्या प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडतात. त्यामुळे त्या भागात तापमान जास्त असते. या पट्ट्यास काय म्हणतात?
- उष्ण पट्टा

पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने सूर्याभोवती फिरत असल्याने तिचे सूर्यापासूनचे अंतर सारखे नसते. जेव्हा पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते तेव्हा त्या स्थितीस .... म्हणून ओळखले जाते.
- उपसूर्य स्थिती

चमकणाऱ्या विजेमुळे हवेतील काही ऑक्सिजनचे .... वायूत रूपांतर होते..
- ओझोन

आपल्या आकाशगंगेचा व्यास किमान .... लाख प्रकाशवर्षे असावा.
- एक

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...