महिला आशिया चषक टी२० क्रिकेट विजेतेपद सातव्यांदा भारताकडे.


 
महिलांची टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा भारतानं सातव्यांदा जिंकली आहे. बांगलादेशात सिल्हेट येथे काल झालेल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर ६९ चेंडू आणि ८ गडी राखून विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा डाव ९ बाद ६५ धावसंख्येवर आटोपला. भारताच्या रेणुका सिंगनं केवळ ५ धावात ३ बळी घेतले.

हे आव्हान सहज पार करताना भारतानं केवळ ८ षटकं आणि ३ चेंडूत २ बाद ७१ धावा करत प्रतिस्पर्ध्यावर सहज विजय मिळवला.

मात्र, भारताची भरवशाची खेळाडू स्मृती मनधानानं २५ चेंडूत नाबाद ५१ तर कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाबाद ११ धावा करत भारतानं विजयाचं लक्ष्य सहज गाठण्यात मोलाची भूमिका बजावली.

  रेणुका सिंगला सामनावीर

दीप्ती शर्माला मालिकावीर (मालिकेत ९४ धावा आणि १३ बळी)

केंद्रीय क्रीडा मंत्री :- अनुराग ठाकूर.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...