Sunday 9 October 2022

समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे निधन

२२ ऑगस्ट रोजी मुलायम सिंह यादव यांना रक्तदाबाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून मुलायमसिंह यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

उत्तर प्रदेशात त्यांना नेताजी या नावानं ओळखले जात असे. मुलायम सिंह यादव यंनी समाजवादी पार्टीची स्थापना केली होती. २०१९ मध्ये ते मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.

समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले आहे. दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी ८ वाजून १६ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते

२२ ऑगस्ट रोजी मुलायम सिंह यादव यांना रक्तदाबाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून मुलायमसिंह यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. उत्तर प्रदेशात त्यांना नेताजी या नावानं ओळखले जात असे.

मुलायम सिंह यादव यंनी समाजवादी पार्टीची स्थापना केली होती. २०१९ मध्ये ते मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. मुलायम सिंह यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचं जुलै महिन्यात निधन झालं होतं. तर, पहिल्या पत्नी मालती देवी यांचं २००३ मध्ये निधन झालं होतं.

मुलायम सिंह यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी झाला होता. मुलायम सिंह हे तरुणपणी कुस्ती खेळायचे. त्यांनी काही काळ कुस्तीचे मैदानही गाजवले. यानंतर मुलायमसिंह यादव यांनी काहीकाळ प्राध्यापक म्हणून काम केले. यानंतर आपले राजकीय गुरू नत्थू सिंह यांच्या सानिध्यात आल्यानंतर मुलायमसिंह यादव यांनी जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात पहिले पाऊल ठेवले.

१९६७ साली ते पहिल्यांदा आमदार झाले. १९८२ ते १९८५ या काळात ते विधानपरिषदेचे सदस्य होते.

मुलायम सिंह यादव हे लोहिया आंदोलनात हिरीरीने सहभागी झालेल्या तरुण नेत्यांपैकी एक होते.

४ ऑक्टोबर १९९२ रोजी मुलायम सिंह यादव यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली.

ते आठवेळा उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून गेले होते. मुलायम सिंह यादव यांना तीनवेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याचा मान मिळाला. तसेच त्यांनी केंद्र सरकारमध्ये संरक्षण खात्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या खात्याचे मंत्रिपद भुषविले होते.

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...