Sunday, 9 October 2022

वाक्यप्रचार व त्याचे अर्थ

वाटाण्याच्या अक्षता लावणे  : स्पष्टपणे नाकारले.

वठणीवर आणणे   : ताळ्यावर आणणेे.

वणवण भटकणे   : एखादी गोष्ट मिळविण्यासाठी खूप फिरणे.

वाचा बसणे  : एक शब्द येईल बोलता न येणे.

विचलित होणे   : मनाची चलबिचल होणे.

विसंवाद असणे  :  एकमेकांशी न जमणे.

वड्याचे तेल वांग्यावर काढणे  : एकाचा राग दुस-यावर काढणे.

विडा उचलणे   : निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे.

वेड घेऊन पेडगावला जाणे  : मुद्दाम ढोंग करणे.

शब्द जमिनीवर पडू न देणे : दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे.

शहानिशा करणे   : एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे.

शिगेला पोचणे   : शेवटच्या टोकाला जाणे.

शंभर वर्ष भरणे   : नाश होण्याची वेळी घेणे.

श्रीगणेशा करणे   : आरंभ करणे.

सहीसलामत सुटणे   : दोष न येता सुटका होणे.

दगा देणे   : फसवणे.

दाद मागणे  :  तक्रार करून किंवा गार्‍हाणे सांगून न्याय मागणे.

दात धरणे   : वैर बाळगणे.

दाढी धरणे   : विनवणी करणे.

दगडावरची रेघ   : खोटे न ठरणारे शब्द.

No comments:

Post a Comment

Latest post

यशाची त्रिसूत्री

कुठल्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी तीन गोष्टी अत्यंत आवश्यक असतात. '✔️वेळ, 😥नियोजन आणि ✔️अंमलबजावणी' कुठल्याही कामाला पुरेसा वे...