Thursday, 16 February 2023

भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा :-



◆ शत्रूंशी लढणाऱ्या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये त्यांच्या पुतळ्याकडे पाहून दररोज मिळावीत तसेच शिवरायांचे शौर्य स्मरून शत्रूंसोबत लढण्याचे बळ मिळावे, यासाठी पुणेकर संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट भारत-पाकिस्तानच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे.


◆ काश्मीरच्या किरण आणि तगधर-टिटवाल खोऱ्यात दोन ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती स्थापन करण्यात येणार आहे.


◆ काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सागर दत्तात्रय डोईफोडे यांच्या पुढाकाराने मूर्ती साकारण्यात येणार आहे.


◆ छत्रपती शिवाजी महाराज अटकेपार स्मारक समितीचे प्रमुख अभयराज शिरोळे आणि आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी या उपक्रमासाठी नियोजन केले आहे.


━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

BIMSTEC ची 25 वर्षे :-

◆ 6 जून 2022 ला बिमस्टेक (BIMSTEC) गटाच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाली. ➤ बिमस्टेक (BIMSTEC) :- ◆ Bay of Bengal Initiative for Multi- Sect...