Saturday 25 May 2024

लक्षात ठेवा


🔸१) महाराष्ट्रातील सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना प्रवरानगर, अहमदनगर येथे उभा राहिला. कोणत्या वर्षी ?

- सन १९४८


🔹२) विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून 'जिजामाता सहकारी साखर कारखान्या'चा उल्लेख करावा लागेल. हा साखर कारखाना कोठे आहे ?

- दुसरबीड (बुलढाणा)


🔸३) मैसुरू येथील वृंदावन गार्डन व काश्मीरमधील शालिमार उद्यान यांच्या धर्तीवर रचना करण्यात आलेले पैठण येथील उद्यान कोणते ?

- ज्ञानेश्वर उद्यान


🔹४) आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे 'सागरीय उद्यान' सिंधुदुर्ग जिल्ह्यात .... परिसरात साकारले जात आहे.

- मालवण


🔸५) महाराष्ट्रातील तसेच भारतातीलही पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान .... या जिल्ह्यास मिळाला आहे.

- सिंधुदुर्ग

.                


🔸6) सन १८७८ मध्ये बांधून पूर्ण झालेली मुंबई उच्च न्यायालयाची इमारत इंग्रजांच्या .... या बांधकाम शैलीचा उत्तम नमुना म्हणता येईल . 

- गॉथिक


🔹7) आता 'छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस' म्हणून ओळखले जाणारे व्हिक्टोरिया टर्मिनस या इटालियन गॉथिक शैलीने बांधलेल्या रेल्वे स्टेशनच्या वास्तुरचनेचे श्रेय कोणास दिले जाते ?

- एफ. डब्ल्यू. स्टीव्हन्स


🔸8) मुंबई उपनगर जिल्ह्यातून जाणारा पश्चिम द्रुतगती महामार्ग (वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे) .... नावाने ओळखला जातो. 

- अली यावर जंग मार्ग


🔹9) मुंबई उपनगरातून जाणाऱ्या ..... महामार्गास  'वसंतराव नाईक महामार्ग' म्हणून ओळखले जाते. 

- पूर्व द्रुतगती महामार्ग (इस्टर्न एक्स्प्रेस हायवे )


🔸10) मुंबई येथील 'ऑगस्ट क्रांती मैदान' पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते ? 

- गवालिया टैंक मैदान


🔸१) ऋग्वेदात सतीच्या प्रथेचा उल्लेख नसल्याचे .... यानी सप्रमाण दाखवून दिले होते.

- रा. गो. भांडारकर


🔹२) 'राजकारणाचे आध्यात्मिकरण' किंवा 'Spiritualization of Politics' हा .....  यांनी मांडलेला महत्त्वाचा विचार होय. 

- गो. कृ. गोखले


🔸३) १४ जून, १८९६ रोजी पुणे येथे 'अनाथ बालिकाश्रमा' ची स्थापना केली ....

-  महर्षी धों. के. कर्वे 


🔹४) महर्षी धों. के. कर्वे यांनी पुणे येथे 'महिला विद्यालया'ची स्थापना केली ....

- ४ मार्च, १९०७


🔸५) स्त्री-उद्धार व स्त्री-उन्नती यांसाठी नि:स्वार्थी व त्यागी कार्यकर्ते तयार करण्याच्या उद्देशाने महर्षी कर्वे यांनी ४ नोव्हेंबर, १९०८ रोजी ....  या संस्थेची स्थापना केली.

- निष्काम कर्ममठ

No comments:

Post a Comment

Latest post

24 मे 2024 चालू घडामोडी

प्रश्न – नुकताच आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर - 22 मे प्रश्न – उत्तर भारतातील वायू प्रदूषण आणि आरोग्यावर होण...