Monday 11 March 2024

देशात CAA कायदा लागू! केंद्र सरकारकडून सीएएची अधिसूचना जारी !

👉 नागरिकत्व सुधारणा कायदा, 2019 :-
◆ CAA :- Citizenship (Amendment) Act, 2019
◆ 2016 मध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए) सादर करण्यात आले. 12 ऑगस्ट 2016 रोजी ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले.
◆ 09 डिसेंबर 2019 :- अमित शहा यांनी विधयक लोकसभेत मांडले.
◆ 09 डिसेंबर 2019 :- लोकसभेत 311 विरुद्ध 80 मतांनी मंजूर
◆ 11 डिसेंबर 2019 :- राज्यसभेत 125 विरुद्ध 105 मतांनी मंजूर
◆ 12 डिसेंबर 2019 :- राष्ट्रपतींची स्वाक्षरी
◆ 10 जानेवारी 2020 :- CAA देशभरात लागू झाला.
◆ या कायद्यानुसार नागरिकत्व कायदा, 1955 मध्ये सुधारणा करण्यात आली.

👉 CAA मधील महत्त्वाच्या बाबी :-
सहा धर्म :- हिंदू, बौद्ध, शीख, जैन, पारशी आणि ख्रिश्चन.
तीन देश :- अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश.
31 डिसेंबर 2014 च त्यापूर्वी आलेल्या अफगाणिस्तान, पाकिस्तान व बांगलादेशमधील अल्पसंख्याकांना नागरिकत्व दिले जाणार.

👉 कायदा कुठे लागू नसणार :-
हा कायदा सहाव्या अनुसूचीमध्ये असणाऱ्या आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांतील आदिवासी क्षेत्रांना.
इनर लाईन परमिट असणाऱ्या अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम आणि मणिपूर राज्यांतील प्रतिबंधित क्षेत्रांना.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

🔶मचकुंदी प्रकल्प  मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मि...