12 August 2025

12 ऑगस्ट 2025.

1.भारतातील पहिला ड्रोन-एआय पॉवर्ड कृत्रिम पावसाचा प्रयोग.

▪️ ठिकाण - जयपूरच्या रामगड येथे.

▪️भारतात पहिल्यांदाच, ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) वापरून कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी क्लाउड सीडिंग तंत्रज्ञानाचा वापर केला.

▪️ उपक्रम भारत-अमेरिका-आधारित तंत्रज्ञान कंपनी GenX AI आणि राजस्थान सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात येत आहे.

▪️ काम कसे करते - लक्ष्यित ढगांमध्ये सोडियम क्लोराईड फवारतील .

▪️ महाराष्टातील प्रयोग - : 1973-1986 : बारामती (महाराष्ट्र) वर ढगांच्या गर्दीमुळे पावसात 24% वाढ झाली.


2.Lock FD Feature

▪️ कुणामार्फत - ॲक्सिस बँक

▪️ उद्देश - ऑनलाइन मुदत ठेवी अकाली बंद होण्यापासून रोखण्यासाठी.

▪️बँकिंग ग्राहकांमध्ये ऑनलाइन फसवणुकीबद्दल चिंता वाढली आहे. फिशिंग , मालवेअर हल्ले होण्यापासून संरक्षण करणे.


3.National Anubhav Awards 2025

▪️ प्रायोजित मंत्रालय - Department of Pension & Pensioners’ Welfare (DoPPW)

▪️ सुरुवात - 2015 मध्ये सुरू

▪️मंत्रालये/विभागांमधील 15 पुरस्कार विजेत्यांचा सत्कार केला जाणार.

▪️पोर्टल कर्मचाऱ्यांकडून निवृत्तीच्या आठ महिने आधी किंवा निवृत्तीनंतर तीन वर्षांच्या आत लेखन मागवते , जे नंतर संबंधित मंत्रालयाद्वारे प्रकाशित केले जातात आणि पुरस्कारांसाठी मूल्यांकन केले जातात. नंतर त्यांची निवड पुरस्कारासाठी केली जाते.


4.आंतरराष्ट्रीय युवा दिन 2025

▪️दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी.

▪️ इतिहास - 1991 ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक युवा मंचाच्या पहिल्या सत्रात आंतरराष्ट्रीय युवा दिनाची कल्पना.

▪️1998 पासून नियमित.

▪️2025 थीम: SDGs आणि त्यापलीकडे स्थानिक युवा कृती


5.पहिले जागतिक एमएस स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार.

▪️ विजेते -नायजेरियन शास्त्रज्ञ डॉ. अ‍डेमोला अ‍डेनले 

▪️ओळख - ज्यांना नायजेरियातील भूक कमी करण्याच्या त्यांच्या परिवर्तनकारी कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे.

▪️पुरस्कार जिंकणारा तो पहिला कृष्णवर्णीय व्यक्ती आहेत.

▪️मोदी यांनी 7 ऑगस्ट 2025 रोजी त्यांच्या नावाने एक जागतिक पुरस्कार - अन्न आणि शांतीसाठी एमएस स्वामीनाथन पुरस्कार - सुरू केला.


6.केनिया

▪️जागतिक आरोग्य संघटनेने केनियाला ट्रायपॅनोसोमियासिस / झोपेच्या आजारापासून मुक्त घोषित केले.

▪️हा महत्त्वाचा टप्पा गाठणारा तो 10 वा देश बनला आहे.

▪️2025 मध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मलेरियामुक्त प्रमाणित केलेला सुरीनाम हा अमेझॉन प्रदेशातील पहिला देश बनला. याव्यतिरिक्त, 2025 मध्ये जॉर्जियाला दुसरा देश म्हणून मलेरियामुक्त घोषित करण्यात आले.

▪️भारताने 2025 पर्यंत मलेरियाचे रुग्ण शून्यावर आणण्याचे आणि 2030 पर्यंत मलेरियाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

No comments:

Post a Comment