Monday 8 April 2024

यावर प्रश्न अपेक्षित आहे..


📊अनावृत्तबीजी वनस्पती (Gymnosperms)

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📌अनावृत्तबीजी गटातील वनस्पती बहुदा सदाहरित, बहुवार्षिक व काष्ठमय असतात. 

📌या वनस्पतींच्या खोडांना फांदया नसतात. 


➡️पानांचा मुकुट तयार झालेला असतो. 

📌या वनस्पतींची नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येतात. 

📌यांच्या बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते, म्हणजेच यांना फळे येत नाहीत, म्हणूनच यांना अनावृत्तबीजी म्हणतात. Gymnosperms म्हणजे Gymnos - न झाकलेले/अनावृत्त, Sperm - बीज.


✅उदा. सायकस, पिसिया (ख्रिसमस ट्री), थुजा (मोरपंखी), पायनस (देवदार) इत्यादी.



☄️☄️आवृत्तबीजी वनस्पती (Angiosperms)☄️☄️

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

💸या वनस्पतींना येणारी फुले हे त्यांचे प्रजननाचे अवयव आहेत. 

💸फुलांचे रूपांतर फळांत होते व फळांच्या आत बिया तयार होतात. 

💸या बियांवर आवरण असते. 

💸Angiosperms = Angios - Cover म्हणजे आवरण, sperm - बी. 

💸ज्यांच्या बियांचे सहजपणे दोन भाग सुटे होतात, त्यांना द्विबीजपत्री वनस्पती म्हणतात.

💸तर ज्यांच्या बियांचे दोन भाग होत नाहीत, त्यांना एकबीजपत्री वनस्पती असे म्हणतात.


➡️उदा...

📌द्विबीजपत्री - घेवडा, शेंगदाणा, चिंच, आंबा 

📌एकबीजपत्री - गहू, मका, ज्वारी


No comments:

Post a Comment

Latest post

राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे..

🔴सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अजय माणिकराव खानविलकर यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 फेब्रुवारी 2024 रोजी लोकपालच्या अध्यक्षपदी नियु...