Monday 8 April 2024

पाणथळ प्रदेशाचे महत्त्व


परिसंस्थेचा अभ्यास

जागतिक अन्नसाखळीमध्ये जलीय परिसंस्थांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या भागात पाणी पूर्णपणे किंवा अंशतः उथळ असते. 

सूर्यप्रकाशाच्या विपूल उपलब्धतेमुळे या परिसंस्थांमधील जैवविविधता लक्षणीय असते. 

यापूर्वी दलदलीच्या प्रदेशासंबंधी प्रश्न विचारण्यात आले होते. 

आगामी परीक्षेतसुद्धा यावर प्रश्न येऊ शकतात.

🌿🌿दलदलीय प्रदेश🌿🌿


दलदलीय प्रदेश हा जमीन आणि पाणी यांच्यामधील संक्रमणात्मक प्रदेश असतो त्याला 'इकोटोन' म्हणतात

. या भागात विविध जलीय वनस्पतींनी व्यापलेले हंगामी उथळ पाणीसाठे आढळतात. 

दलदलीय प्रदेश ठरविण्यासाठी तीन महत्त्वाचे घटक ठरतात.

१) प्रदेश कायमस्वरूपी पाण्याखाली असणे.

२) या भागात जलीय वनस्पतींचे अस्तित्व असणे.

३) जलसंपृक्त मृदा असणे.

दलदलीय प्रदेश हे जमीन आणि पाणी यादरम्यान नैसर्गिक बफर म्हणून कार्य करतात.

 दलदलीय परिसंस्था या आर्थिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाच्या असून अनेकांच्या उपजीविकेशी संबंधित आहेत.

🌾🌾संवर्धनाचे महत्त्व🌾🌾

दलदलीय प्रदेश हे विविध प्रकारे मानवासाठी महत्त्वाचे आहेत. 

विविध बुरशी, वनस्पती, वृक्ष आणि जलीय प्राण्यांचा अधिवास असणाऱ्या या परिसंस्थेची उत्पादकता खूप जास्त आहे. स्थलांतर करणाऱ्या जगभरातील ८०० पक्षी प्रजातींपैकी ५० % पेक्षा जास्त पाणथळ परिसंस्थांवर अवलंबून आहेत.

सौंदर्यदृष्टीनेसुद्धा दलदलीत परिसंस्था या अमूल्य आहेत.

 मात्र अनियंत्रित वापरामुळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे या परिसंस्थांची हानी होत आहे. 

जगातील एक जैवविविधता संपन्न असणाऱ्या या परिसंस्थांचे संवर्धन करणे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत निकडीचे आहे.

🌱🌱रामसर करार🌱🌱

इराणमधल्या रामसर शहरात २ फेब्रुवारी १९७१मध्ये हा दलदलीय प्रदेशसंबंधी आंतरराष्ट्रीय करार स्वीकारण्यात आला.

 हा करार पक्ष्यांचा अधिवास म्हणून पाणथळ परिसंस्थांचे संवर्धन आणि धोरणी वापर ही दोन मुख्य उद्दिष्ट्ये अधोरेखित करतो. 

जागतिक महत्त्व असणाऱ्या दलदलीत प्रदेशांची रामसर यादी हा या कराराचा महत्त्वाचा भाग आहे. २ फेब्रुवारीला हा करार स्वीकारल्यामुळे तो दिवस ‘जागतिक पाणथळी दिवस’ म्हणून साजरा केला जातो

. रामसर कराराचे तीन प्रमुख आधारस्तंभ हे धोरण वापर, रामसर यादी व आंतरराष्ट्रीय सहकार्य हे आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...