29 October 2025

रिओ परिषद


🌍 रिओ परिषद व पर्यावरणाशी संबंधित करार

🔹️जागतिक स्तरावर कायद्याच्या शासन विकासासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी जागतिक आराखडा ठरला.

महिला सक्षमीकरण, स्थानिक शासन व बिगर सरकारी संघटनांना यावर भर देतो.

पर्यावरण बचाव, वनसंवर्धन

क) कायदे आणि करार

रिओ परिषदेने यांच्याशी संबंधित ३ कायदेशीर व बंधनकारक करार मांडण्यात आले :


1️⃣ जैविक विविधता अभिसंधी (Convention on Biological Diversity)

➤ सदस्य : १९६

➤ अंमलात : २९ डिसेंबर १९९३

➤ उद्दिष्टे :

▪ जैविक विविधता घटकांचा शाश्वत वापर करणे

▪ उत्कोनीय सोतांचा लाभ न्यायपूर्ण देणे


2️⃣ संयुक्त राष्ट्र पर्यावरण बदलावरील अभिसंधी चौकट (UNFCCC – United Nations Framework Convention on Climate Change)

➤ सदस्य : १९७

➤ अंमलात : २१ मार्च १९९४

➤ उद्दिष्ट :

▪ वातावरणातील हरितगृह वायूंचे (GHG) प्रमाण पर्यावरणाला घातक ठरेल एवढ्या स्तरापेक्षा कमी ठेवणे


3️⃣ संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंध अभिसंधी (UNCCD – United Nations Convention to Combat Desertification)

➤ सदस्य : १९७

➤ अंमलात : २६ डिसेंबर १९९६

➤ उद्दिष्टे :

▪ वाळवंटीकरण रोखणे

▪ दुष्काळग्रस्तांसाठी लागवडीस प्रोत्साहन देणे

▪ दुर्भिक्षकाळासाठी लागवडीस सहाय्य करणे


🔹️स्पष्टीकरण

➤ १९७२ ची UNEP आणि ब्रुटलँड आयोगाच्या शिफारशीने प्रेरित होऊन १९९२ ला ब्राझीलमधील रिओ डी जानेरो या शहरात पहिली वसुंधरा परिषद भरली. तिलाच रिओ परिषद म्हणतात.

➤ या परिषदेचे शीर्षक होते :


🔹️संयुक्त राष्ट्राची पर्यावरण व विकास परिषद (UNCED – United Nations Conference on Environment & Development)

➤ या परिषदेने ३ आराखडे बनविले :

अ) रिओ घोषणापत्र

▪ विविध देशांच्या आणि समाजाच्या सहकार्याने नवीन आणि समान न्याय देणारी जागतिक भागीदारी निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली.

ब) अजेंडा २१

▪ जून १९९२ ला हा करार संमत झाला.

▪ शाश्वत विकासासाठी आंतरव्यवस्थांना स्थानिक, राष्ट्रीय व प्रादेशिक सहकार्यात कृती आराखडा बनविणे.

No comments:

Post a Comment