29 October 2025

बहुमताचे प्रकार आणि वापर

 

▪️ साधे बहुमत

▪️ पूर्ण बहुमत

▪️ प्रभावी बहुमत

▪️ विशेष बहुमत

▪️ विशेष बहुमत + साध्या बहुमताने 50% राज्यांची मान्यता


1) साधे बहुमत (Simple Majority)

✅ स्पष्टीकरण :

▪️ उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 50% पेक्षा जास्त (50% + 1) असे बहुमत संदर्भित करते.

▪️ कार्यशील बहुमत म्हणून देखील साधे बहुमत ओळखले जाते.


💥 उदाहरण :

→ लोकसभेतील सदस्य संख्या : 545

→ अनुपस्थित सदस्य : 45

→ मतदान न करणारे : 100

→ म्हणजे उपस्थित व मतदान करणारे : 400

→ 400 च्या 50% पेक्षा जास्त म्हणजे 200 + 1

→ तर लोकसभेतील साधे बहुमत असेल : 201


✅ वापर / उपयोग :

सर्वसाधारण धन/वित्त विधेयक पारित करण्यासाठी

अविश्वास प्रस्ताव / विश्वास प्रस्ताव / निंदाव्यंजक प्रस्ताव / स्थगन प्रस्ताव पारित करण्यासाठी

उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी लोकसभेत

आर्थिक आणीबाणी लागू करण्यासाठी

राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी

कलम 2 व 3 नुसार नवीन राज्य निर्मिती

संसदेत विधापरिषद निर्मिती / नष्ट करण्यासाठी


2) सर्वकष बहुमत / पूर्ण बहुमत (Absolute Majority)

✅ स्पष्टीकरण :

▪️ सदनाच्या एकूण सदस्य संख्येपैकी 50% पेक्षा जास्त सर्वंकष बहुमत संदर्भित करते.


💥 उदाहरण :

→ लोकसभा सदस्य संख्या : 545

→ तर लोकसभेतील सर्वंकष बहुमत : 545 च्या 50% + 1 = 273


✅ वापर / उपयोग :

सर्वंकष बहुमताचा वापर केंद्र आणि राज्य सदनांमध्ये सहसा होत नाही.

परंतु केंद्र किंवा राज्य सरकारे स्थापनेवेळी या बहुमताचा वापर होतो. (सर्वसाधारण निवडणुकांनंतर)


3) प्रभावी बहुमत (Effective Majority)

✅ स्पष्टीकरण :

▪️ सदनाच्या सदस्य संख्येच्या (रिक्त जागा वगळता) 50% पेक्षा जास्त (50% + 1) संख्या प्रभावी बहुमत संदर्भित करते.

▪️ 50% of the effective strength of the house

▪️ When Indian Constitution mentions "All the then member" that refers to the effective majority.


💥 उदाहरण :

→ लोकसभा सदस्य संख्या : 545

→ रिक्त जागा : 45

→ म्हणजे त्यावेळी सदनाची कार्यक्षम संख्या : 500

→ प्रभावी बहुमत : 500 च्या 50% + 1 = 251


✅ वापर / उपयोग :

उपराष्ट्रतींना पदावरून दूर करण्यासाठी राज्यसभेत वापर (कलम 67b)

लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करणे

राज्य विधानसभेचे व विधान परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करणे


4) विशेष बहुमत (Special Majority)

💥 साधे बहुमत, सर्वंकष बहुमत, प्रभावी बहुमत या व्यतिरिक्त असलेले बहुमत हे विशेष बहुमत प्रकारात येईल.


✅ विशेष बहुमताचे 4 प्रकार आहेत :


💥 प्रकार 1 : कलम 249 नुसार विशेष बहुमत

▪️ सदनातील उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमत

🔸 उदाहरण :

→ राज्यसभा सदस्यसंख्या : 245

→ फक्त 150 सदस्य उपस्थित व मतदान करणारे

→ तर विशेष बहुमत लागेल : 101


✅ वापर / उपयोग :

👉 राज्यसूचीतील विषयांवर कायदा करण्याचा संसदेला अधिकार प्रदान करण्यासाठी


💥 प्रकार 2 : कलम 368 नुसार विशेष बहुमत

▪️ सदनातील एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने (50% + 1) आणि उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने संमत


💥 उदाहरण :

→ लोकसभा सदस्य संख्या : 545

→ एकूण बहुमत (50% + 1) = 273

→ उपस्थित व मतदान करणारे : 500

→ त्यांचे 2/3 = 334


✅ वापर / उपयोग :

घटनादुरुस्ती विधेयके पारित करण्यासाठी

सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करणे

महालेखापरीक्षक आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांना पदावरून दूर करणे

राष्ट्रीय आणीबाणीस मान्यता देण्यासाठी दोन्ही गृहात


❇️ विशेष बहुमताचे उर्वरित 2 प्रकार :


💥 प्रकार 3 : कलम 368 नुसार विशेष बहुमत + साध्या बहुमताने 50% राज्यांची मान्यता

▪️ प्रकार 2 नुसार विशेष बहुमत + निम्म्यापेक्षा जास्त राज्यांच्या विधानसभांतील साध्या बहुमताने विधेयक पारित


👉 उदाहरण :

→ प्रकार 2 नुसार विशेष बहुमत

→ 28 राज्यांपैकी 50% + 1 म्हणजे 15 राज्यांची मान्यता


✅ वापर / उपयोग :

संघराज्यीय संरचनेतील बदल होत असलेल्या घटनादुरुस्तीसाठी

उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे स्थान

National Judicial Appointment Commission (NJAC) ही या प्रकारातील दुरुस्तीचे उदाहरण


💥 प्रकार 4 : कलम 61 नुसार विशेष बहुमत

▪️ सदस्यांच्या एकूण संख्येच्या 2/3 बहुमताने

→ लोकसभा : 545 च्या 2/3 = 364 मते

→ राज्यसभा : 245 च्या 2/3 = 164 मते


✅ वापर / उपयोग :

👉 राष्ट्रपतींवरील महाभियोगावेळी हे बहुमत लागते.

No comments:

Post a Comment